Friday 8 July 2011

मूर्खांचे विद्यापीठ

मूर्खांचे विद्यापीठ
 
कवीला कवितेतून बोलायचे होते
मूर्खांच्या बाजारात 
अभ्यासाचे वावडे होते
कळणार नाही 
असेच काहीसे लिहायचे होते
 
पण आता सर्वच शहाणे 
बोला अभ्यास कुणाचा ?
 
जो तो बोलतो ऐकीवातली भाषा
पुस्तकाची कपाट धूळखात मरते
जाता जाता सांगते
मूर्खांचे विद्यापीठ पुस्तकात नसते
 
आता बोला.....
काय लिहू ? कुणी सांगेल का ?
मूर्खांच्या गटारगंगेत
गटांगळ्या खायचे का ?
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.

No comments:

Post a Comment