Thursday 28 July 2011

संदीप सर हि कविता फक्त तुमच्या साठी

संदीप सर हि कविता फक्त तुमच्या साठी

खिश्यातल्या पेनात नेहमीच
ज्वालाग्राही पदार्थ घेऊन हिंडणारा
एक मनस्वी…
म्हणलं तर तपस्वी…
नाहीतर उनाड स्वच्छंदी कवी..
जेव्हा शिवी देतो..
तेव्हा गर्दीच्या खालावलेल्या नजराही…
वर पाहू लागतात..इतकंच !!
खरंतर निर्भीड, बंडखोर शब्द
कागदावर लिहून
समाजावर गोंदवण्याचा
हा छंद.. रूढार्थाने
नॉन प्रॉफिट मेकिंग !!
पण हाच कवी जेव्हा शिवी देतो,
तेव्हा ह्याचा तारसप्तक
कुठेतरी गर्दीतल्याच षंढ मनांना
चाळवत असतो..इतकंच !!
ह्या समाजावरची व्यंध्यत्वाची पुटं काढतांना
त्याचं शस्त्र…प्रत्येक हल्ल्यानंतर
धारधारच होतंय अधिकाधिक…
ह्याने केलेली वळलेल्या मुठींची भाषांतरं..
एव्हाना तारस्पप्तकाने
‘फ्रेश’ झालेल्या मनांवर आदळतात
तेव्हा
आत्तापर्यंत खिश्यात असलेले
तटस्थ हात..
सिस्टीमचा ढासळता चिरा सावरायला
नकळत उंचावलेले असतात…इतकंच !

by Vinod Pawar

No comments:

Post a Comment