पत्रिका लग्नाची
कळत नकळत मिठी मारली,
गुलाब समजून काटे रुतली,
खिलखीलना-या चेह-यावरती
लट केसांची रुतून बसली
प्रेमाचा हा मोहक गंध
दरवडतो या चहु भूमीवर
कपड्यामागील डीओ चा सुगंध
मनातून येतो सदा दुर्गंध
तुझी लगट आता जिव्हारी आली
कालच्या रात्रीची चाहूल देऊन गेली
घरातल्या पंख्याला फाशीची दोरी
पत्रिका लग्नाची घरी आली.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर
Mast Ahe....Khupach chan....!!!
ReplyDelete