Thursday, 11 August 2011

राज ठाकरे यांना खुले पत्र...

राज ठाकरे यांना खुले पत्र...

हे पत्र राज ठाकरे या दादर इलाख्यात पाळलेल्या आणि आजकाल महाराष्ट्रावर, इथल्या राजकारणावर आणि विचारांवर भूंकणा-या...........समजून घ्या तुम्हीच....! मी सांगणार नाही.... 
प्रती,
       राज ठाकरे
       सस्नेह सप्रेम "जय भीम"

 राज ठाकरे नावाचा नवा राजकीय आतंकवादी महाराष्ट्राने निर्माण केला आहे. राजकीय पटलावर विरोधकांना नामोहरम करण्याची याची शैली जरा जास्तच प्रसिद्ध बनत चालली आहे. परंतु याच शैलीला महाराष्ट्रातील जनतेने डोक्यावर घेतल्याने राज साहेब जरा जास्तच हवेत उडायला लागले आहेत. सध्या त्यांचे पाय जमिनीवर नाही. ते जनतेलाच जमिनीवर आपटावे लागणार आहे. कायद्याला धाब्यावर बसवून यांनी मोर्चा काढला. म्हणे शासनाच्या विरोधात आणि पोलिसाच्या हितासाठी तो मोर्चा होता. परंतु राज साहेब तुमची लपलपनारी जीभ जरा जास्तच मस्तीत होती. तुमचा मोर्चा पोलिसांच्या हितासाठी नव्हता. तुमचा मोर्चा हा मुस्लीम विरुद्ध दलित (आंबेडकरी) समाजाला आमोरासमोर आणण्याचा होता. कुठलेही कारण नसतांना तुम्ही इंदू मिल, आंबेडकरी नेते, आणि आंबेडकरी स्मारकाची केलेली टिंगल टवाळी हे स्पष्ट करीत होती. असे तुम्ही काही पहिल्यांदा केलेले नाही. याआधी सुद्धा तुम्ही असे बरेच काम केलेले आहे. परंतु मुंबईच्या गुजरात्यांच्या भरोश्यावर पलणारे तुम्ही तुमची खरी ओळख हा आंबेडकरी माणूसच करून देऊ शकतो हे तुम्ही विसरले. त्यासाठी तुम्हाला हे थोडेसे... 
         महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाचायला, लिहायला अतिशय भाऊक वाटणारा हा प्रादेशिक पक्ष...सरळ महाराष्ट्रीयन माणसाच्या हृदयात हात घालून तुम्ही त्याची उभारणी केली...अपेक्षित यश मिळाल्याने तुमचे पंख बळकट झाले...जिव्हाळ्याने तरुण तुमच्या सोबतीला आले...भुकेने आतुर पण सर्वत्र ठणठनाट असल्याने तडफडणाऱ्या मासोड्यांना खुमखुमीत व्यंजन लावून गळ सोडावी आणि त्या गळाला लागण्यासाठी मासोड्यांनी धाऊन पडावे... एवढेच तुमच्या बाबतीत...कारण मासोड्यांना हे माहित नव्हते कि ते कुणाच्या तरी शिकारी गळाला लागणार आहेत...घरी जाऊन त्यांची मछली फ्राय आणि आणखी वाटेल ते करून कुणासमोर तरी तुडून तुडून खाण्यासाठी वाढण्यात येणार आहे...हे त्या निरागस मासोड्यांना माहित नसते...हीच भारतीय मासोड्यांची खासियत...त्यातही मराठी माणसाची खासियत...मात्र तुम्ही पट्टीचे आचारी निघाले आणि तितकेच खवय्ये...त्याबद्दल मराठी माणूस तुम्हाला तुमच्या पहिल्याच प्रयत्नात यशाच्या शिखरावर पाहतो...जे भल्याभल्यांना जमले नाही तो खमंग राजकीय मसाला तुम्ही काढला...त्याबद्दल धन्यवाद तुमचे नाही तर...शिवाजी पार्क च्या शिवनेरीवर असलेल्या त्या आलेशान, गर्भगळीत, अक्ख्या महाराष्ट्राची भट्टी करणा-या पाकखाण्याचे धन्यवाद...

           राज...राजे हो...राजकारणाचे धडे जसे गिरवले गेले...तसेच तुम्ही पिकविले...पण महाराष्ट्रीय माणसाच्या चारीत्र्यालाच तुम्ही तुमच्या भट्टीवर शिजविले हे तितकेच खरे नाही का ?...ज्यांचा जयजयकार करीत माणसे पेटविली त्यांच्यात राजकीय नैतीकवाद नव्हताच...असे आम्ही म्हणावे का ?...रयतेचा राजा हे विशेषण कि दूषण...बघा जरा विचार करून अभिमन्यू झाल्यासारखे वाटते का ?...अंतर्गत राजकारण आणि बाह्य राजकारण यांच्यातील गफलत भल्याभल्यांना जमली नाही...आम्ही मात्र शेफटाचेच कि नाही ?...जे तळ्यात नाही ते मळ्यात येणार कुठून ?...पण वासलात लागली या व्यवस्थेची...इथल्या भल्या माणसाची त्याचे काय हो राजे...?

            जी मुस्सदेगिरी बाह्य राजकारणासाठी दाखविली जायला पाहिजे...त्याला तुम्ही अंतर्गत राजकारणाची रीड ची हड्डी बनविली...आणि जो शहाणपणा अंतर्गत राजकारणासाठी आवश्यक होता तो तुम्ही बाह्य राजकारणात चारी मुंड्या चीत होण्यासाठी दाखविला...शेवटी काय मिळाले त्यातून...पेटलेल्या भट्टीचा धूर थोडा आणखी वाढला...एवढेच कि नाही !...राजे हो घरातल्यांना बाहेर हाकलता आणि बाहेरच्यांना दिवाणखान्यात लोळविता...हे राजकारण कोणत्या कोठ्यावरचे संगीत आहे कळत नाही बघा !...बरे त्यासाठी कुठला पर्यायही देत नाही...माझ्याकडे पर्याय असून तुमच्यासारखा राजकीय कोठा नाही...अन नाही कुठले पार्लर आहे माझ्याकडे...तुम्ही मात्र वारसा चालवता...तुमचे अभिनंदनच...! राज साहेब जी पोथी वाचून तुमचा जन्म झाला...पण तीच पोथी वाचून तुमची मनसे उभी झाली असेल यावर विश्वास नाही...या देशाच्या सर्वोच्च पोथीचा वापर करून तुम्ही चालायला लागले...वर मानेने जगायला लागले ती पोथी कुठल्या कपाटात आहे ?...संविधान म्हणतात त्याला...जरा शोधा !...किती त्रास घेतला असे पोराचे नामकरण करतांना पोथी  वाचण्यासाठी...आता जरा देशाचे भले करण्यासाठी देशाची पोथी उघडा...बघा काय गम्मत होईल...!


             जातीच्या नावाने नाही...तर आर्थिकतेच्या नावाने आरक्षण...हा फंडा तुम्ही दिला...तसे फंडे देण्यात तुम्ही पटाईत...यात काही शंकाच नाही...कधी परकीय राज्यातील...कधी मुंबई मराठ्यांची...असे अनेक फंडे तुम्ही आजपर्यंत दिले...मेंढ्यांचा कळपातील मेंढपाळ बनणे तुम्हाला तेव्हा जमले असेल...शेवटी मेंढ्यांचे एकच वैशिष्ट्य...मेंढपाळाच्या मागेमागे खाली मान घालून चालणे...मात्र यावेळच्या फंडयाला तुम्ही मेंढ्यांच्या कळपात नाही तर छाव्यांच्या कळपात सोडले आहे...लक्ष्यात घ्या...इथला प्रत्येक छावा सदैव आपली नजर आजूबाजूच्या जगाचा कानोसा घेत असतो...डोळे मिटून दुध पिणे यांना जमत नाही...
                 राजे हो...मराठीच्या नावाने भूलथापा देता...स्वतःच्या पोराला इंग्रजीत शिकविता...इतकेच काय तर पुस्तकही इंग्रजीतून काढता...आता तो मी नाही...कृपया असा आव आणू नका...इथेही तुमच्याकडे काहीच प्लान नाही...मराठी आमच्यासाठीही प्राणप्रियच आहे कि राव...पण त्याचे जरा नीट गणित बसवा कि, जिथे तुम्हालाही ठेच लागणार नाही आणि इथल्या चिल्या-पिल्यांनाही त्याची झळ पोहोचणार नाही...जरा मुंबई च्या सोनेरी चंदेरी पिंज-यातून बाहेर पडून भामरागडच्या विस्तीर्ण आवारात या...जमले तर मेळघाटातल्या विहारात वास्तव्याला या...जातीचे आणि आर्थिकतेचे तुमचे अख्खे  बीजगणित कोलमडून पडल्याशिवाय राहणार नाही...त्यातही फ़क़्त राजकारणच शोधू नका...
  
  राजे हो...जरा राजकारणाच्या वेश्यालयातून माणसांच्या वेदना विश्वात डोकावून पहा...माणसांच्या कल्याणाचे राजकारण करा...होता होईस्तोवर माझ्या प्रश्नांचेही उत्तरे द्या...! मलाही जरा तुमच्या सुपीक डोक्याच्या मानसगर्भातून मुक्त होऊ द्या...मराठीच्या प्रेमाखातर तुमच्या ऋणातून नेता होऊ द्या... 
१)     शिवनेरीच्या कोट्यातून मनसे उभी करतांना त्या कलीन्याच्या चाळीतला कुणी भेटला नाही का ?...
२)     हे जातीचे आरक्षण होते कि आर्थिकतेचे होते ?...जरा समजावून सांगाल  का  ? ...
३)     सरकारी दफ्तरात विदेश वा-या करणारे जेव्हा दारिद्र्य रेषेत येतात...तेव्हा त्यांच्यासाठी आता आरक्षण द्यायचे आहे का ?
४)     आर्थिकतेचे नियम काय ते तरी स्पष्ट होऊन जाऊ द्या ?
५)     सरकारी दफ्तरातून आधी तुमच्या नावासमोर असणारी जात तरी काढून दाखवणार आहात का ?
६)      तुमच्या पोराला फ़क़्त एक भारतीय म्हणूनच सरकारी नोंद होऊन जाऊ द्या ?  जात आणि धर्म तरी त्याच्या उरावर बसवू नका ?
७)     झोपडपट्टीतल्या लोकांना तुमच्या विधानसभेत बसवून दाखवणार आहात का ?  कारण आर्थिकतेच्या आधारावर विधानसभेवर त्याचा पहिला अधिकार आहे.
८)     आय आय टी आणि आय आय एम मधेही झोपडपट्टीचाच पहिला अधिकार आहे...चला आता होऊन जाऊ द्या ?
९)     आय ए एस अधिकारी म्हणून पहिला मान झोपडपट्टीचाच आहे...बनवणार का ?
१०)    मंदिरातल्या संपत्तीवर झोपडपट्टीचा ताबा देणार का ?
११)     देवालयाच्या गाभा-यात झोपडपट्टी बसेल का ?...तुम्हाला चालत असेल तर होऊनच जाऊ द्या...!
१२)    चला आता आपण उलटे चालायला शिकू या ! गरिबांची कीव आलीच आहे...तेही आर्थिकतेच्या नावावर तर सर्वच ठिकाणी आता झोपडपट्टी पासूनच सुरवात होऊन जाऊ द्या !
१३)    फायदा घ्यायचा असेलच तर तुम्ही हि झोपडपट्टीत राहायला या...आमच्यासोबत..?
१४)    झोपडपट्टीला आर्थिक आरक्षण देणार आहात कि पुन्हा महालातच आरक्षणाचे गवत खाणार आहात...याचे तरी उत्तर द्या ?
१५)    झोपडपट्टीतला समाज कोणत्या जातीचा आहे यापेक्षा तो गरीब आहे हे महत्वाचे नाही का...मग चला तर महालातल्या जातींचे सर्वे करायला तयार व्हा !
१६)     इतके वर्षे राजकारण केले आता इतरांना जागा देणार आहात का ?  तोंडातले दात पडेपर्यंत असंवैधानिक राजकीय आरक्षणाचे मलींदे खाणा-यांना  आता घरी बसवायलाही तयार होणार आहात का ?
१७)    बेरोजगारांना राजकीय नौकरी, राजकीय आरक्षण देणार आहात का ? तो पण मोडतो तुमच्या आर्थिकतेच्या निकष्यावर...चला तर येणा-या निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षांच्या ५० % जागा राजकीय आरक्षण म्हणून बेरोजगारांना देणार आहात का ?
राजे हो...
आता मी पण आर्थिकतेच्या नावावर विधानसभेची जागा मागणार आहे...
आणि विरोधात उभा राहणा-याची जात नाही तर संपत्तीच मोजणार आहे...
आता मी पण आय ए एस होणार आहे...बुद्धीमत्तेवरच पण त्यातही गरिबीचा दाखला घेऊन 
चला तुम्ही पण या रे माझ्या गरीब बेरोजगारांनो...
आता हे आपल्याला आपल्या दारिद्र्यावर यांची जागा देणार आहेत...
आणि आपली जागा आता हे घेणार आहेत...काय राजे आहात ना तय्यार...
आता आम्ही थेट संसदेत गरिबीच्या दाखल्यावर जाणार आहोत...
गरीबीचे मोजमाप कराया आता यांचे नाही...तर आम्हीच आमच्या गरीबीचे मोजमाप करणार आहोत...
कारण...महालातले दारिद्र्यात येतात हे यांनीच सांगितले आहे...
करोडोचा दाखला फ़क़्त काही हजारावर होतो...१०० रु. नोट द्या...मी हजाराचा दाखला तुम्हा देतो...
चला तर आता मुक्तपणे आर्थिक आरक्षण घेऊ या...
...काय राजसाहेब... आहे का उत्तर...तुमच्याजवळ नक्कीच नसेल पण माझ्याजवळ आहे...कारण... तुमच्यापेक्षा लाख पटीने मीच गरीब आहे...जात इथे  कुणाला पाहिजे आहे राजसाहेब... जातीला आग लावायला सगळ्यात आधी आम्हीच येणार आहोत...कारण याच जातीने आम्हाला  रोज जाळले आहे... आम्हालाच नाही तर आमच्या हजारो पिढ्या आणि वस्त्याच्या वस्त्या याच जातीने बेचिराख केल्या आहेत...हजारो वर्षे जात तेव्हा पोसली गेली...मुक्तहस्ते...आम्ही आता तर तुमची बरोबरी करण्यासाठी काही वर्ष जात ठेवली ती पण व्यवहारात नाही तर आरक्षणात...त्याचा तुम्हाला इतका विटाळ आला...याचे आम्हाला आनंद होत आहे...पण एक लक्षात ठेवा राज साहेब हि जात फ़क़्त आरक्षणातूनच जाणार नाही तर प्रत्येकच स्थरातून गेली पाहिजे...तोच आमचा एकमात्र उद्देश आहे...पण त्याआधी पुन्हा तेच मागतो...आरक्षणाचे काय करायचे ते करा...पण आधी...पुन्हा एकदा...
पहले हक़ दिलाओ 
फिर कर्तव्य की बात करो 
पहले संसांधन में हिस्सा दिलाओ 
फिर प्रतिशत की बात करो  
पहले इन्सान को इन्सान समझो  
फिर आरक्षण से होने वाले अन्याय की बात करो  
पहले गुलामी को छोड़ो  
फिर आरक्षण के खिलाफ लढो
पहले समानता की व्यवस्था बनाओ  
फिर आरक्षण का विरोध करो
---
प्रा संदीप नंदेश्वर, नागपुर.  

11 comments:

  1. jau dya nandeshvar saheb te aplya ajobanche nahi jhale tar Apale kuthun honar

    ReplyDelete
  2. This letter is right

    Jai Bhim

    ReplyDelete
  3. Mr Nandeshwar.... First learn English properly... You need better teachers... I think you got PhD through reservations & not because of your knowledge.

    ReplyDelete
    Replies
    1. correct comment. At last original is original....

      Delete
    2. Tuzya ghareche nakki Britishankade gele asatil.ani tasa itihas hi aahe. Jarass wachan wadhava. Kujkya aai bapachya shikavani tun baher ya. Beduk kitihi fugala tari hatti hot nahi. Ani original auladinno tumhi kiti original aahat... Te itihasat bagha jaun ... Bap janmat parat tond var Karun baghaychi himmat nahi honar.... Aani hech tumach khara dukhana aahe. Mhanu adhun madhun swatala dilasa deta....hahahhaaa. Kivvv yete tumachi. UCHHASHIKSHIT JANAVARE...

      Delete
  4. sir tumchakade shabdanchi banduk ahe ani ticyat kadhi na sampnarya golyaa ahe mala far awadle aple lekh.

    ReplyDelete
  5. वेद पुराणाच्या गढूळ डबक्यात वास्तव करणारा हा हराहरामखोर आहे हा धर्मलंड

    ReplyDelete
  6. वेद पुराणाच्या गढूळ डबक्यात वास्तव करणारा हा हराहरामखोर आहे हा धर्मलंड

    ReplyDelete
  7. Very beautiful message.. मनुवादी लोकाना नक्कीच आवडनार नाही. कारण ज्याची जळते त्यालाच कळते.अशी त्यांची अवस्था झाली आहे. आता लोकाना खोटे बोलुन फसवायचे दिवस गेलेत. आता तरी चांगला विचार करा लोकांच्या, मानवांच्या हिताचा(ईथे मी जनतेच्या,समाजाच्या,धर्माच्या म्हणत नाही)

    ReplyDelete
  8. Aajchya marathi tarunane raaj thakre namak bhampak rajkarni vyaktichya mage na jata swatacha uddhar swata kela pahije.

    ReplyDelete
  9. Aajchya marathi tarunane raaj thakre namak bhampak rajkarni vyaktichya mage na jata swatacha uddhar swata kela pahije.

    ReplyDelete