Monday 1 August 2011

बाबासाहेब अजूनही बॉलीवूड मधून उपेक्षित का आहेत ?

चित्रपट हे मनोरंजनाचे मध्यम म्हणून वापरले जात असले तरी त्यातून प्रभावित होणा-यांची संख्या काही कमी नाही.  आरक्षण चित्रपटात मुळात काय आहे आणि आरक्षणाच्या तत्वांना कश्यापद्धतीने मांडले गेले आहे हे पाहणे गरजेचे आहे. कारण ते जर चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी जर बघितल्या गेले नाही तर आरक्षणाच्या तत्वांना काळिमा फासण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून तो प्रदर्शित होण्याआधी समाजातल्या काही सामाजिक आणि परिवर्तनवादी नेत्यांकडून व विचारवंतांकडून बघितला जावा अशी मागणी आहे ती अगदी रास्त आहे. ती मागणी जर मान्य होत नसेल तर नक्कीच त्यात काहीतरी शिजतेय असे दिसून येते. गांधी च्या विचारधारेवर चित्रपट बनविणा-यांना अद्याप बाबासाहेबांची विचारधारा देशासाठी महत्वाची का वाटत नाही ? मी स्वतः अश्याच एका विषयावर स्क्रिप्ट लिहून एका चित्रपट निर्मात्याला दिली होती. परंतु त्याचा लो बजेट आड आला. आता सांगा कि बाबासाहेब अजूनही चित्रपट विश्वातून मुळात बॉलीवूड मधून उपेक्षित का आहेत ? जर कुणी बाबासाहेबांवर अगदी लगे रहो मुन्ना भाई पेक्षा तोडीची स्क्रिप्ट मी द्यायला तयार आहे. सांगा काढेल का कुणी माझ्या बाबासाहेबांवर चित्रपट तोही बॉलीवूड मधून ?  अगदी त्याच तोडीचा ! आम्हाला आता यावरही विचार करावा लागेल. हे लक्षात घ्या ! आरक्षण चित्रपटाने आता कोर्टाची पायरी चढली आहे. वाट बघूया निर्णयाची ! इथे फ़क़्त इतकेच.

2 comments:

  1. सुंदर. आपले प्रयत्न समाजासाठी हितावह आहेत.
    जय भीम. नमो बुद्धाय.
    सह्याद्रि बाणा
    http://www.sahyadribana.com/

    ReplyDelete
  2. Bollywood must be afraid of the sensitive reactions of Dalit community. If the director and some actors in the films are brahmins, then they will be literary hanged by the community for their smallest mistake in the film though unintentionally.

    ReplyDelete