Monday 29 August 2011

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि "लोकपाल"

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि "लोकपाल"

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि "लोकपाल"

भारताला भ्रष्टाचाराच्या चक्रीवादळाने भन्नावून सोडले आहेचहुबाजूने भ्रष्टाचाराचे वारे वाहू लागले आहेसभोवतालची धूळ, मिट्टी या भ्रष्टाचाराच्या चक्रीवादळाने स्वतःमध्ये सामावून घेतली आहेभारतीयांना फ़क़्त भ्रष्टाचार नावाचे बाह्यरूपी चक्रीवादळ दिसत आहेपरंतु हे चक्रीवादळ जे आक्राळविक्राळ रूप घेऊन बाहेरचे रूप दाखवित आहे. त्यापेक्षा कितीतरी भयंकर आणि आक्रमक रूप या चक्रीवादळाच्या आत शिजले जात आहे. अनेकांना भरडले जात आहे. पिळले जात आहे. मुरगाळले जात आहे. भ्रष्टाचार हे त्याचे बाह्य आवरण आहे.  मुळात याचे स्वरूप हे जातीय, वर्णीयवर्गीय  आणि धार्मिक आहे. पण भ्रष्टाचाराच्या बुरख्याआड त्याचे हे स्वरूप सर्वसामान्य भारतीयांना दिसत नाही. तशी व्यवस्थाही केली गेली आहे. जगातल्या कुणालाच ते कळू नये कि नेमके काय करायचे आहे ? आणि काय चालले आहे"लोकपाल" किंवा "जन लोकपाल" अश्या गोंडस नावाने भ्रष्टाचाराला समोर आणले जात आहे. मुळात याचे स्वरूप आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वर्णीय, वर्गीय, जातीय असेच आहे.  हे स्वरूप बाबासाहेबांच्या परिप्रेक्षातून अगदी तंतोतंत या देशातील सर्वसामान्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे.

मुळात भारतात आज जे काही "अण्णा हजारे आणि त्याच्या टीम" च्या माध्यमातून चालले आहे. त्याचे खरे स्वरूप बाबासाहेबांनी २१ डिसेंबर १९२८ च्या बहिष्कृत भारताच्या अंकात लिहिलेले होतेअगदी तीच प्रक्रिया आज "भ्रष्टाचारा"चे नाव घेऊन "अण्णा हजारे" ला "गांधीवादा"चा चष्मा चढवून "लोकपाला"चे भूत लोकांच्या मानगुटीवर बसवून "सिविल सोसायटी" च्या माध्यमातून चालविली जात आहे. यांचा बळी बडतो आहे तो भारतीय माणूस ज्याने हा विचारच डोक्यातून काढून घेतला आहे. हि सर्व प्रक्रिया "आज घडून येत आहे" असे कुणीही समजून घेऊ नये. हजारो वर्षे जी "जातीवादी, वर्णवादी, धार्मिक  वर्गीय व्यवस्था" इथे चालू होती.  त्या व्यवस्थेला छेद देऊन "भारतीय संविधानाने जी समानतेची व्यवस्था" निर्माण केली. ती व्यवस्था यांना मोडीत काढायची आहे. त्यासाठी हे षड्यंत्र गेल्या अनेक वर्षापासून आखण्यात आले आहे. त्यामुळे ते आजचे आहे असे समजून घेण्याची चूक कुणी करू नयेहि "समानतेची व्यवस्था निर्माण होणार आहे" हे यांना आधीच ठाऊक होते. त्यामुळेच 1836 मध्ये इथल्या हिंदुत्ववाद्यांनी 175 वर्षांचा मास्टर प्लान आखला होता. तो मास्टर प्लान आज २०११ हा आहे. आणि म्हणूनच आज भारतात अस्थिरथा "लोकपालाच्या  निर्मितीच्या" संबंधाने आखण्यात आली आहे. 1836 ला आखण्यात आलेला मास्टर प्लान आता अंमलबजावणीत आणायचा आहे. तुम्ही आम्ही सर्व त्यात बळी पडणार आहोत. हेही तितकेच सत्य आहे.

 बाबासाहेब बहिष्कृत भारताच्या २१ डिसेंबर १९२८ च्या अंकात लिहितात, "कनिष्ठ माणसे अनेक दिवसांच्या कनिष्ठ भावनेच्या शिकवणीमुळे स्वतःच कनिष्ठ आहोत असे मानावयास लागून श्रेष्ठांचे श्रेष्ठत्व कानिष्ठांचे कनिष्ठत्व हे कृत्रिम कारस्थान नसून दैवाचा ठेवा आहे असे मानावयास लागतात ज्या अन्यायाविरुद्ध बंद करणे त्यांचे कर्तव्य असते त्याच अन्यायाला आपले नशीब म्हणून ते खुशीने मान देतातइतकेच नव्हे तर ज्यांच्या वर्चस्वाला ते आपली मान वाकवितात त्यांना लोकपाल, भूदेव, राजाधिराज अशा विशेषणाने संबोधून त्यांची प्रशंसा करू लागतात." (संदर्भ :- लेखन आणि भाषण खंड १९डॉबाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारितापानक्र. ३९०)

आता याचाच आढावा आजच्या वास्तवात "लोकपाला"च्या आणि "अण्णा त्यांच्या टीम" च्या माध्यमातून चालना-या "आंदोलना"च्या संबंधाने घेऊ या ! मुळात आज भारतात जे आंदोलन सुरु आहे. ते भ्रष्टाचाराच्या नावानेयाच्याही मुळाशी आहे ती "आर्थिकता." म्हणजेच वर्णव्यवस्था, वर्गव्यवस्था.  आज मंदिर, उद्योग, व्यापार, व्यवसाय, शिक्षणसंस्था आणि एन जी अश्या खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून संपत्तीची मोठी लुट केली जात आहे.  संपत्तीचे केंद्रीकरण होत आहे. हि सर्व संपत्ती काही विशिष्ठ वर्गाच्या हातात सामावली जात आहेकारण हि सर्व क्षेत्रे काही वर्गांच्याच, काही लोकांच्याच हातात आहेत. त्यामुळे कमालीची आर्थिक विषमता पहावयास मिळत आहेत्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याची सूबुद्धी  "अण्णा  टीम" ला येत नाही.
  
अश्या परिस्थितीत सर्वसामान्य माणूस आर्थिक विषमतेच्या अन्यायाविरुद्ध पेटून उठणार हे निश्चित होते. मग तो माणूस हा यांची संपूर्ण व्यवस्था उलथवून लावायसाठी समोर येईल हे वास्तव होते. संविधान त्याच्या पाठीशी होतेम्हणून अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने त्याला त्याच्या मार्गापासून भटकविण्यासाठी आणि त्याचेच समर्थन घेऊन त्याच्याच हाताने त्याचीच व्यवस्था उलथवून लावण्यासाठी आजचे हे आंदोलन जाणीवपूर्वक निर्माण केल्या गेले आहे. गरिबीचा आकडा वाढत आहे तर मूठभरांच्या संपत्तीचाही आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आर्थिक विषमतेने एक व्यवस्था निर्माण केली आहे. उच्च वर्णीय अधिक गब्बर होत चालला आहे. तर सर्वसामान्य बहुजन भिकारी बनत चालला आहे. मग या बहुजानाला त्याच्या भिकारीपनाचे कारण "राजकीय भ्रष्टाचार" आहे असे सांगून संविधानाच्या विरुद्ध कृती साठी चेतविले, पेटविले जात आहे. "लोकपाल" किंवा "जन लोकपाल" असे गोंडस नाव घेऊन "सिविल सोसायटी" म्हणजे उच्चवर्णीय श्रेष्ठीय सर्वसामान्य "भारतीय बहुजनांचा" म्हणजेच "कनिष्ठांचा" वापर करून मुळच्या अन्यायाविरुद्धच्या लढ्यापासून दूर नेत आहेत. मग हेच लोक  "राजकीय भ्रष्टाचाराला" समोर केल्यामुळे मूळ भ्रष्टाचारापासून दूर जातात. अन्यायाविरुद्धाची लढाई इथेच थांबते.  आणि "सिविल सोसायटीला" समर्थन करण्याच्या नावाखाली कनिष्ठ वर्ग श्रेष्ठ वर्गाच्या आंदोलनाला समर्थन करतातआज "अण्णा हजारे त्यांच्या टीम" ला समर्थन करणा-यांनी "सिविल सोसायटी" च्या समोर आपली मान वाकविली आहे. म्हणजेच बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे, "इतकेच नव्हे तर ज्यांच्या वर्चस्वाला ते आपली मान वाकवितात त्यांना लोकपाल, भूदेव, राजाधिराज अशा विशेषणाने संबोधून त्यांची प्रशंसा करू लागतात."

अश्याच प्रकारे आज "अण्णा हजारे त्यांची टीम" तत्सम प्रकारच्या लोकांच्या "लोकपाला"पुढे आणि "सिविल सोसायटी" च्या नावाखाली उच्चवर्णीय श्रेष्टीजन वर्गापुढे भारतीय माणूस नतमस्तक होत आहे. आपली मान वाकवीत आहे आणि "लोकपालाची" प्रशंसा करू पाहत आहे.
बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे हाच तो "लोकपाल राजा"  "कनिष्ठ बहुजन समाजाला" गुलाम बनविण्यासाठी "अण्णा हजारे आणि सिविल सोसायटी"च्या उच्चवर्णीय टीम ला बनवायचा आहे. त्यासाठी बाबासाहेबांनी त्याआधी केलेल्या विश्लेषणाला त्यांनी अतिशय सूत्रबद्ध रीतीने चालविले. त्यामुळेच आज अण्णा टीम ला देशातून समर्थन प्राप्त होत आहे. देश्यातल्या लोकांना हे वाटायला लागले आहे कि आम्ही कनिष्ठ आहोत त्यामुळे आम्ही काहीच करू शकणार नाही म्हणून त्यांनी "उच्चवर्णीय अण्णा टीम" ला त्यांच्या भाग्याचा निर्णय घेण्यासाठी समर्थन देऊन टाकले आहे. परंतु या मेंढरांच्या कळपाला हे माहित नाही किंवा ते हे विसरले आहेत कि या देश्यातल्या संविधानाने त्यांच्याच हातात मोठे शस्त्र दिले आहे. संविधान नावाचे हे शस्त्र नीट चालविण्याचे प्रशिक्षण दिले गेले किंवा हे संविधान शस्त्र नीट हाताळले तरी देशाचे आणि याच मेंढरांच्या कळपांच्या भविष्याचे सोने होऊ शकते. हे ते विसरले आहेत. आणि बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे'त्यांच्या कनिष्ठतेला त्यांनी दैवाचा ठेवा मानून श्रेष्ठांच्या हाती कोलीत दिले आहे.
 
आज "अण्णा टीम" ज्या विजयाच्या आवेशात वागत आहे. ती परिस्थिती येणारच याचे कारण स्पष्ट करतांना बाबासाहेब पुढे म्हणतात, "कनिष्ठांच्या अंतःकरणात श्रेष्ठ वर्गाच्या पूज्य बुद्धीचे पिढ्यानपिढ्या संगोपणाने तिची पाळेमुळे इतकी खोल जातात कि, कालांतराने ज्यांना एकदा पूज्य मानण्याची मनाला सवय झाली, ते त्या आदरास पत्र नसले तरी त्याचा अपमान किंवा धिक्कार करणे तर राहोच पण त्यांना सर्वांसारखे लेखण्याचे देखील धैर्य त्यांना होत नाहीते सांगतील ते ऐकण्याची, वागतील तसे वागण्याची आणि नेतील तिकडे जाण्याची त्यांना सवय लागते....उलटपक्षी श्रेष्ठ लोकांची स्तुती होत गेल्यामुळे त्या स्तुतीस आपण सर्वस्वी पात्र आहोत अशी त्यांची भावना होते कालांतराने ती भावना अंगात मुरली म्हणजे आपण परमपूज्य आहोत असे स्वतःचे ठाम मत करून घेतात आणि लोकांनी आपण होऊन मान दिला नाही तर त्यांना दंडून त्यांच्या कडून तो घेण्याचा ते प्रयत्न करतात." (संदर्भ :- लेखन आणि भाषण खंड १९डॉबाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारितापानक्र. ३९०)

बाबासाहेबांनी केलेले हे वक्तव्य आणि सांगितलेली चिकित्सा आणि आज अण्णा टीम ची वर्तणूक यात कुठेही तफावत दिसून येत नाही. "सिविल सोसायटी"ने, त्यांच्या बुद्धीने दिलेला, तयार केलेला एकमात्र  कायदा तोच श्रेष्ठ असाच समाज आज अण्णा टीम च्या समर्थकांनी करून घेतला आहे. आणि म्हणूनच "अण्णा हजारे टीम सिविल सोसायटी या लोकांसाठी पूज्य ठरू लागली आहेती इतकी पूज्य बनली आहे कि देशातली संसद, संविधान त्यांना काहीच दिसत नाही. इतकेच काय तर त्यांना या भारतीय संविधानाने लोकशाहीने दिलेले निवडणुकीचे आणि मतदान करण्याचे मुलभूत स्वातंत्र्यहि हे लोक विसरले आहेतअश्या लोकांनी एकदा तरी बाबासाहेब वाचायला घ्यावा.

 आज कुणीही अण्णा वर बोलायला तयार होत नाही. लोकशाहीच्या विरुद्ध, संविधान विरुद्ध कृती करूनही समर्थक जनता त्यांच्याविषयी बोलण्याचे धैर्य धाखावत नाही उलट त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार मेंढरांची जमात रस्त्यावर उतरून कमाल लागते. "अण्णा टीम" नी सांगितलेलेच ऐकतात आणि ते जिकडे घेऊन जातील तिकडे हि मेंढरांची जमात जात आहे. त्यामुळेचअण्णा परमपूज्य बनत चालला आहे. त्याची टीम स्वतःला परमपूज्य बनवून घेण्यात व्यस्त झालेली आहे. कारण त्यांना तुमची हि समानतेची व्यवस्था तुमच्याच हातून उलथवून लावायची आहे. लोकशाही, संसदीय सार्वभौमत्व संपवून वर्गीय हुकुमशाही आणायची आहे. आणि हे सर्व हि मेंढरांची जमात त्यांच्या नादी लागून स्वतःला गुलामीच्या छायेत झोकु पाहत आहे.

बाबासाहेबांनी केलेले विवेचन आणि मौलिक विचार आजचे झणझणीत वास्तव तुमच्या आमच्या या संपूर्ण समाजाच्या समोर मांडत आहे. तरीही आम्ही याकडे डोळेझाक का करीत आहोत ? बाबासाहेबांनी केलेले वर्णवादाचे, वर्गवादाचे हे विवेचन आणि त्यातून अस्तित्वात येणारा "लोकपाल राजा" आज कश्या पद्धतीने इथली लोकशाही, संविधान, संसद, जनतेचा अधिकार, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व गिळंकृत करू पाहत आहे. आतातरी आम्ही आमच्या डोळ्यावरही झापडी उघडणार आहोत कि नाही. आतातरी बाबासाहेबांच्या परीप्रेक्षातील संविधानाला प्रत्यक्षात अंमलबजावणीत आणणार आहोत कि नाही. बाबासाहेबांनी दिलेला धोक्याचा इशारा, लोकपालाचा राजाधिराज होण्यापासून आम्ही सावधगिरी बाळगायची कि नाही.

आतातरी समाजाने पेटून उठणे गरजेचे आहे. लोकपाल हे पदच आम्हाला अमान्य आहे कारण ते वर्गवादाचे, हुकुमशाहाचेराजतंत्रचे निदर्शक आहे. म्हणून भ्रष्टाचार निर्मुलनासाठी एक नवीन संवैधानिक प्रशासक लोकपाल व्यतिरिक्त तयार करावा. जो संसद, न्यायपालिका आणि संविधानाच्या चौकटीत असेल. संविधान धोक्यात टाकून, तुमचे आमचे अधिकार धोक्यात टाकून, समतावादी समाज व्यवस्था धोक्यात टाकून, संवैधानिक लोकशाहीला धोक्यात टाकून लोकपाल राजा बनवू नये. या मागणीसाठी आता समाजमन पेटविण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. सरकार आणि तत्सम संविधान प्रेमींच्या पाठीशी राहून "उच्चवर्णीय अण्णा सिविल सोसायटी" च्या टीम चे षड्यंत्र हाणून पडण्याची हि वेळ आहे. अन्यथा राजाधिराज, भूदेव, लोकपाल राजा तुमच्या आमच्या मस्तकी हे "उच्चवर्णीय अण्णा सिविल सोसायटी" ची टीम लादणार आहे.

अण्णा भगाओ, देश बचाओ !
संविधान चलाओ, भ्रष्टाचार मिटाओ
अधिकार बचाओ, प्रशासक बनाओ !
संसद की सार्वभौमता मान्य करो, वरना देश खाली करो !
न्यायपालिका की लाज बचाओ, नागरिक होने का हक़ जताओ !
पहले मंदिर की संपत्ति बाटो, फिर गरिबो को न्याय दिलाओ
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपुर, ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१

संदर्भ :- .   लेखन आणि भाषण खंड १९डॉबाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारितापानक्र. ३९०  
             डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक, (बहिष्कृत     भारतता२१ डिसेंबर १९२८