Tuesday 26 July 2016

आंबेडकर भवन" : भावना, भावनिकता की कायदा*

🇪🇺 *"आंबेडकर भवन" : भावना, भावनिकता की कायदा* 🇪🇺

🇪🇺✍🏻 *आम्ही कुणाचे बेगडी, सत्तेचे, पैशाचे की काय'द्याचे* ? 🇪🇺

✍🏻 आंबेडकर भवन प्रकरणात ज्यांना जनभावनेला साथ देता आली नाही. चळवळीच्या अस्मितेसाठी जे जनतेच्या सोबत राहू शकले नाही. असे *काही सदगृहस्थ (महाभाग) "कायदा" पुढे करून आंबेडकरी जनतेमध्ये संभ्रम पसरवित आहेत. ऐनकेन प्रकारे आंबेडकर भवन प्रकरणातून सत्तेच्या (आरएसएस) व त्यांच्या हस्तकांच्या विरोधात आंबेडकरी चळवळीत तयार झालेला आक्रोश त्यांना "कायदा" हे गोंडस नाव पुढे करून थांबवायचा आहे.* आंबेडकर भवन मध्यरात्री पाडतांना यांचा "कायदा" कुठे गेला होता ? बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस हा ऐतिहासिक ठेवा जमिनदोस्त करतांना व त्यावर हातोडा मारतांना यांचा "कायदा" कुठे गेला होता ? *आजकाल आंबेडकर विरोधकांची (आंबेडकरी परिवेशात फिरणारे) सकाळ, दुपार, संध्याकाळ कायद्यानेच व्हायला लागली. हे हल्ली कायद्याची चटणी, कायद्याची पोळी, कायद्याचा झूणका, कायद्याचा पाणी रात्रीबेरात्री बाटलीतून पीऊ लागलेत.* अशीच काहीशी परिस्थिती दिसून येत आहे. हे सर्व करतांना यांना कायदाही निट समजत नाही. *सर्वसामान्य आंबेडकरी जनतेने मात्र या संभ्रमातून बाहेर पडावे. व आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेशी, अस्तित्वाशी आपल्या भावना आणखी घट्ट करावे.* ✍🏻

✍🏻 मुळात "कायदा" मोडून आंबेडकर भवन उध्वस्त करण्यात आले. "कायदा" हातात घेऊन समाजाच्या/चळवळीच्या ऐतिहासिक पाऊलखुणा पुसायचा प्रयत्न केला गेला. कायद्याला न जूमानता पैशाच्या व अधिकारपदाच्या गुर्मित वावरणाऱ्यांनी पब्लिक पॉपर्टीवर हल्ला चढविला. आम्हाला कायद्याचा धाक नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्व कृत्याबद्दल कायद्यानेच त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहीजे अशी अपेक्षा असतांना कायद्यानेच त्यांना पाठीशीही घातले. या सर्व परिस्थितीत *मध्यरात्री पोलिस प्रशासनाचा कायदा पोलिस स्टेशन मध्ये बंदद्वार 'मुन्नी बदनाम हूई' खेळत होता. तर सरकारचा कायदा मध्यरात्री "ऑन ड्युडी...पांडे की सिटी" वाजवित होता. आता कायद्याचे "आता वाजले की १२.००" असतांना जनतेने निर्णय घेऊन 'आंबेडकर भवन' उभारायचे ठरवले तर लगेच यांचा "कायदा" फुगडी घालायला लागला.* मग *१९ जूलै ला मुंबईच्या रस्त्यावर आंबेडकरी जनतेचा आलेला महापूर हा "कायद्या" चे बोला व "कायद्या"ने वागा. हे सांगायसाठीच उतरला होता. सोबतच ज्या जनतेच्या भावनांवर रत्नाकर व साथीदारांनी जो बूलडोजर चालविला होता त्याच भावना सोबत घेऊन तो रस्त्यावर होता. व आजही आंबेडकर भवनाशी त्याच भावना घेऊन तो सोबत आहे.* तुमच्या "काय'द्याचे" काटेरी मुकूट तो भावनेने लाथाडतोय एवढेच.

✍🏻 *समाज हा भावनाशिल आहे व तो राहील. कारण माणूस हाच मुळात भावनाशिल आहे. ज्याला भावना नाही तो माणूस नाही.* परंतु आंबेडकर भवन प्रकरणात एकीकडे भावनाशिल झालेल्या समाजाला कायद्याने बांधण्याचा प्रयत्न काही भावनाहीन माणसं करतांना दिसतात. *आंबेडकर भवन प्रकरणात भावनिक होऊ नका, असे सल्ले देणाऱ्या* या जनावरांना भावना काय असतात व कायदे काय असतात हे समजावून सांगावेच लागेल. *त्यासाठी काही टेस्ट :-*

1⃣ दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर संपुर्ण देशात आंदोलने उभी झाली. कायदा असतांना जनतेने भावूक होऊन आपल्या तिव्र भावना प्रदर्शित केल्या. देशातील जनता एका भगिनीसाठी भावनिक झाली. या भावना इतक्या तिव्र होत्या की, जनतेच्या भावना लक्षात घेऊन सरकारलाही झुकावे लागले. *"निर्भया" प्रकरणात भावनेचा महापूर इतका होता की, कायदा करावा लागला. कायदा बदलावा लागला. निर्भया नावाने विविध योजना काढाव्या लागल्या. निर्भया नावाने वेगवेगळे प्रयोग करावे लागले.* जनतेला भावनिक होऊ नका म्हणून सांगणारे याचे उत्तर देतील का की, *कायदा असतांना तेव्हा आंदोलन का करावे लागले ? कायदा असतांना कायदा का बदलावा लागला ? बलात्काराची पहिली घटना नसतांना जनता कायद्यावर विश्वास न ठेवता इतकी भावनिक का झाली ? अन्य योजना कार्यान्वित असतांना "निर्भया" नावाने नव्या योजना का काढाव्या लागल्या ? ही भावनिकता नव्हती का ? कायदा असतांना भावनिकतेला का महत्व देण्यात आले ?* कायद्याचा कुत्रा चावलेल्या अ-भावनिक जनावरांना याचे उत्तर देता येईल का ?

2⃣ नुकताच कोपर्डी बलात्कार प्रकरणात भावनिक आंदोलन सुरू झाले आहे. सर्व जनतेच्या भावना पिडीत भगिनिला व तिच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी तिव्र आहेत. पण त्याहीपेक्षा आरोपींना फासावर लटकविण्यासाठी जनतेच्या भावना अधिक तिव्र आहेत. *कायदा आहे. आरोप सिद्ध झाल्यावर कायद्याने आरोपींना शिक्षा होईलही. परंतु आरोप सिद्ध होण्याआधीच आरोपीला फासावर लटकविण्याची मागणी ही कायदा आहे की भावनिकता ? मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना कोपर्डी गावाला भेट देऊन पिडीत परिवाराची सांत्वना करता येते. पण मा. अॅड. प्रकाश आंबेडकरांना तिथे जाण्यापासून थांबविले जाते. हा कायदा आहे की भावनिकता ? मुख्यमंत्र्याला किंवा इतरांना कायदा लागत नाही मात्र प्रकाश आंबेडकरांना कायदा लागतो. हा कायदा आहे की भावनिकता ? खुद्द मा. मुख्यमंत्री महोदय कोपर्डी घटनेतील आरोपींना फासावर लटकवू. फाशीची शिक्षा देऊ. असे म्हणतात. मग आरोप सिद्ध न होताही मा. मुख्यमंत्री महोदय फाशीची गोष्ट कायद्याच्या आधारे करतात की भावनिकतेच्या ? मुख्यमंत्र्यांना कायद्यापेक्षा भावनिकता महत्वपुर्ण का वाटली ?*

✍🏻 वरील दोन्हीही उदाहरणात भावनिकतेने कायद्यावर मात केली हे स्पष्ट दिसून येते. *जीथे समाजाच्या अस्तित्वाशी जुळलेल्या भावनेचा व भावनिकतेचा प्रश्न उपस्थित होतो तीथे चार पाऊले मागे राहून कायदा जनभावनेला सलाम ठोकतो.* आंबेडकर भवन प्रकरणात कायदा व भावनिकता दोन्हीही जनतेच्या बाजूनेच आहेत. किंवा आंबेडकर भवन पाडणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांच्याच बाजूने आहेत. परंतु *कायद्याचा कुत्रा चावलेल्यांना "आंबेडकर भवन" मुद्यावर भावनिकता केली जात आहे. असे सांगून आंबेडकर भवन पाडणाऱ्यांच्या कृतीचे समर्थन करायचे आहे.* सर्वसामान्य जनतेला अञानात ठेऊन आंबेडकरी चळवळीला संपविण्यासाठी सरकार प्रायोजित गुलाम दलालांना पाठीशी घालायचे आहे. व त्यामागून *आरएसएस* चे छुपे कारस्थान यशस्वी करायचे आहे.

✍🏻 त्यामुळे *"आंबेडकर भवन" प्रकरणात कायद्याने समाजाला किती न्याय मिळेल वा न मिळेल हे आताच सांगता येणार नाही. परंतु हे प्रकरण आंबेडकरी जनतेच्या भावनेने व भावनिकतेने आम्हाला जिंकावेच लागणार आहे.* "काय'द्याचा" बळगा पुढे करून आंबेडकरी समाजाची भावनिकता संपविण्याचा प्रयत्न केला जाईल. संभ्रम निर्माण केला जाईल. अशावेळी आंबेडकरद्रोह्यांशी लढतांना आंबेडकरी समाजाची ही परिक्षा राहील. *"आंबेडकर भवन" प्रकरण आंबेडकरी समाज भावनिकतेने जिंकू शकला नाही तर पुढील काळात समाजावर होणारे अन्याय अत्याचार असेच कायद्याने दाबले जातील.* त्यामुळे *"आंबेडकर भवन" प्रकरणात आपण (समाजाने) उचलून धरलेली सत्याची बाजू व त्यामागची भावनिकता तशीच तिव्र ठेऊन ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. तुमची भावनिकता निस्सीम ठेऊन कायद्यालाही तुमच्या बाजूला उभे करावे लागेल. कायद्यानेही जिंकू आणि अस्मितेनेही जिंकू.*
___🏃🏻अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...🏃🏻🇪🇺

Saturday 23 July 2016

लढाई संपली किंवा कुणीतरी लढाई जिंकली असा गैरसमज कुणी करून घेऊ नये.

✍🏻 *न्यायालयातून बेल मिळणे म्हणजे आरोपमुक्त किंवा दोषमुक्त होणे नव्हे.*🏃🏻

👹 *आंबेडकर द्रोह्यांनो व समाजद्रोह्यांनो आंबेडकर भवन प्रकरणात दोषींना न्यायालयाने बेल दिली (अटकपुर्व जामिन दिला) याचा अर्थ न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त किंवा दोषमुक्त केले असे होत नाही.*👹

✍🏻 आंबेडकर भवन प्रकरणात ४ आरोपींना खालच्या कोर्टाने अटकपुर्व जामिन मंजूर केला आहे. त्यामुळे रत्नाकर गायकवाड व त्याचे पाठीराखे काही समाजद्रोही व काही वकील मंडळी जणू काही आरोपी आरोपमुक्त झाले. दोषमुक्त झाले. अशा आविर्भावात येऊन प्रकरण दडपण्याचा व जनउद्रेकाला शमविण्याचा वायफळ प्रयत्न करीत आहेत. परंतु हे करीत असतांना कायद्याच्या अल्पञानाने स्वतःच तोंडघषी पडून समाजातली आपली दारे बंद करीत आहेत. *हे सर्व बुजगावणे सरकारी दलाल आहेत हेच सिद्ध करीत आहेत.*

✍🏻 *एखाद्या आरोपात एखाद्या आरोपीला जामिन देणे किंवा न देणे हा न्यायालयाचा Discretionary Power आहे.* बहूतांश हा अधिकार वापरतांना न्यायालय पोलिसांनी केलेल्या तपासात *(Report & Investigation)* काय आलेले आहे हे पाहून निर्णय घेत असतो. क्रिमीनल प्रॅक्टीस मध्ये सहसा आम्ही वकील मंडळी पोलिस *Investigation च्या Loopholes* चा लाभ घेऊन आरोपींना जामिन मिळवून देत असतो.  त्यामुळे खालच्या न्यायालयाने आंबेडकर भवन प्रकरणात ४ आरोपींना जामिन दिला आहे याचा अर्थ पोलिस तपासात काहीतरी हलगर्जी करण्यात आलेली दिसून येते. यात सरकार व पोलिस प्रशासन जबाबदार धरता येईल. *सुरवातीपासूनच सरकार व पोलिस प्रशासनाची या प्रकरणात भुमिका ही संशयास्पद होती. हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे.* त्याचा अपेक्षित परिणाम अपेक्षेप्रमाणेच झाला व ४ आरोपींना अटकपूर्व जामिन मंजूर झाला.

✍🏻 महत्वाची बाब या जामिन प्रकरणात ही सुद्धा आहे की, कोर्टाने आरोपींना जामिन देतांना दुःख ही व्यक्त केले आहे. तसेच काही मर्यादा *(Limitations)* ही घालून दिल्या आहेत. आरोपींना आंबेडकर भवन परिसरात जाण्यास न्यायालयाने बंधन घातले आहे. या बाबी लक्षात घेतल्या तर *न्यायालयापुढे या प्रकरणाची दाहकता होती. जनभावना, जनप्रक्षोभ न्यायालयाच्या निदर्शनात होता. असे असतांनाही नाराजी व्यक्त करून न्यायालयाने जामिन मंजूर का केला ? हा संशोधनाचा विषय राहील.* त्यामुळे मा. न्यायालयाचा आदर राखून कुठेतरी शासकीय स्तरावरून या सर्व प्रकरणाला दडपण्याचा शिस्तबद्ध प्रयत्न होतो आहे हे उघडपणे दिसून येते.

✍🏻 आज सकाळी मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत या विषयावर चर्चा झाली तेव्हा आंबेडकर भवन प्रकरणापेक्षा बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस या ऐतिहासिक धरोहरेला ऊध्वस्त केले जाणे हा अक्षम्य गून्हा आहे. परंतु न्यायालयाने त्याकडे दुर्लक्ष का केले हा चिंतेचा विषय होता. न्यायालयाने जामिन मंजूर करतांना त्याची *Intensity* लक्षात घेतली नाही. हे खेदाने म्हणावे लागते. *तरीसुद्धा सरकार या जामिनाच्या विरोधात उच्च न्यायालयात जामिन रद्द करण्यासाठी केव्हा अर्ज करते. व त्यामागे काय भूमिका घेते याकडे लक्ष ठेऊन आहोत.* मुख्यमंत्री २८ तारखेला उच्च न्यायालयात जामिन रद्द करण्यासाठी अर्ज करून चांगल्यात चांगल्या सरकारी वकिलामार्फत मा. उच्च न्यायालयात जामिनाला विरोध करतील अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या सोबतीला आम्ही आमचे क्रिमीनल पॅक्टीस मधील दिग्गज वकीलांची टिम उच्च न्यायालयात सरकारी पक्षाला सहाय्य करण्यासाठी देणार आहोत. *त्यामुळे लढाई संपली किंवा कुणीतरी लढाई जिंकली असा गैरसमज कुणी करून घेऊ नये.*

✍🏻 खालच्या कोर्टाने काही लोकांना जामिन मंजूर केला असला तरी कायद्याने तिथेच हे प्रकरण थांबत नाही. *आरएसएस प्रणित सरकार व सत्ता आंबेडकरी आंदोलनाला दडपूण काढण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावेल. हेही तेवढेच सत्य आहे. १९ जूलै ला मुंबईत आंबेडकरवाद्यांचा पाहीलेला उग्र रूप शमविण्याचा व कायदाप्रेमी आंबेडकरवाद्यांना न्यायालयाचे निर्णय पुढे करून कायद्यानेच गूमराह करण्याचा प्रयत्न केला जाईल. हे सुद्धा वास्तव राहील.* परंतु न्यायिक लढाई आम्ही लढत राहू. सत्ता आमच्या न्यायिक लढाईला कितीही कमजोर करण्याचा प्रयत्न करील तरी सुद्धा आम्ही लढत राहू. पुर्वाश्रमिचे न्यायिक अनुभव लक्षात ठेवून.

✍🏻 या सर्व प्रकरणात महत्वाचे हे आहे की, न्यायालयीन कोर्टात आरोपींना जामिन मिळाला असला तरी जनतेच्या न्यायालयात आरोपींना जामिन मिळणे अशक्य व असंभव आहे. *मुळात आंबेडकर भवन व बूद्धभूषण प्रिटींग प्रेस ज्या आंबेडकरद्रोह्यांनी व गद्दारांनी उध्वस्त केली त्या गद्दारांचा निर्णय कायद्याने प्रस्थापित न्यायालयाचा नव्हे तर समाजाच्या, जनतेच्या न्यायालयाचा आहे. कारण हा हल्ला आंबेडकरी अस्मितेवरचा, अस्तित्वावरचा व आंबेडकरी ऐतिहासिक धरोहरेवरचा आहे. त्याला उध्वस्त करण्यासंबंधीचा आहे. १९ जूलै च्या मोर्चाने जनतेच्या न्यायालयाने त्यांचा निर्णय आरोपींविरोधात दिलेला आहे. कायद्याने प्रस्थापित न्यायालयाचे निर्णय त्यापुढे गौण ठरते. कारण शेवटी जनतेच्या न्यायालयाने घेतलेले निर्णय कायद्यात रूपांतरीत होऊन न्यायालयीन कामकाजाचा भाग ठरीत असते.*

✍🏻 *मा. न्यायालयाच्या निर्णय मान्य करून आता हा आंबेडकर भवन प्रकरणातील आरोपींविरोधातला खटला दूहेरी न्यायालयात चालविला जाणार आहे. एकीकडे कायद्याने प्रस्थापित न्यायालयात खटला चालेल तर दूसरीकडे आंबेडकरी समाजाच्या जनतेच्या न्यायालयात हा खटला चालेले. तसेही आंबेडकरी जनतेच्या न्यायालयाने १९ जूलै ला या खटल्यातला पहीला निर्णय घेऊन ३० जूलै पासून श्रमदानातून आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटींग प्रेस परत उभारली जाईल असा निर्णय घेतलेला आहे.*

✍🏻 एका जनतेच्या न्यायालयाचा निर्णय झालेला आहे. दुसऱ्या कायद्याच्या न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची प्रतिक्षा राहील. *परंतू जनतेच्या न्यायालयाने रत्नाकर गायकवाड, बोगस ट्रस्टी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या समाजद्रोही आंबेडकर विरोधकांना समाजातून बेदखल करण्याचा निर्णय लाखो जनसमुहाच्या साक्षीने १९ जुलै ला घेतला आहे. तोच अांबेडकरी चळवळीसाठी अंतिम निर्णय आहे. व राहील.*
___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

*आंबेडकरी चळवळीने नेतृत्वाची गरज सिद्ध केली.*

🇪🇺 *१९ जुलै च्या महामोर्चाने आंबेडकरी चळवळीला काय दिले.* 🇪🇺

🙏 *आंबेडकरी चळवळीने नेतृत्वाची गरज सिद्ध केली.* 🙏

🏃🏻 *१९ जुलै २०१६ ला झालेल्या मुंबई येथील मोर्चाने आंबेडकरी चळवळीसाठी नेतृत्वाची आवश्यकता व ते भक्कम नेतृत्व असेल तर त्याची उपयुक्तता सिद्ध केली.* 🏃🏻

✍🏻 आंबेडकरी चळवळीने नेतृत्व स्विकारावे. एक नेतृत्व निवडावे. नेतृत्वाशिवाय आंबेडकरी चळवळ उभारी घेणार नाही. *नेतृत्वाचे टोळके घेऊन आंबेडकरी चळवळ ध्येय गाठू शकणार नाही.* एक नेतृत्व स्विकारूनच आंबेडकरी चळवळ गतवैभव प्राप्त करू शकते. हे मागील ४-५ वर्षात मी सातत्याने मांडत होतो. लिहीत होतो. सांगत होतो. ती मांडणी १९ जूलै च्या मोर्चाने अगदी लिलया अधोरेखीत केली. हे मान्य करावे लागेल.

✍🏻 १९ जुलै ला झालेला मोर्चा हा वरकरणी सर्वपक्षीय व एकंदरीतच आंबेडकरी चळवळीचा मोर्चा होता. मी त्या मोर्चाला संयुक्त म्हणणार नाही. परंतु सुरवातीपासून (मोर्चाची घोषणा झाल्यापासूनच) या मोर्चाचे नेतृत्व मा. अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर करणार हे निश्चित होते. हा मोर्चा एका आंबेडकरी नेतृत्वात निघालेला मोर्चा होता. मा. बाळासाहेब आंबेडकर नेतृत्व करणार म्हणून त्यावर अपेक्षेप्रमाणे 👹 विरोधकांनी (आंबेडकरी चळवळीच्या विरोधकांनी) खलही केला. पण शेवटी नेतृत्वाचा निर्णय मोर्चात सहभागी झालेल्यांनी घेऊन चळवळीपुढे एक आदर्श निर्माण केला. नैसर्गिक आपत्तीमुळे (पावसामुळे) जे सहभागी (शारिरिकदृष्ट्या) होऊ शकले नाही. परंतु मानसिकरित्या त्यांनीही नेतृत्वावर विश्वास टाकून नेतृत्व निवडले. जे व्यक्तीगत कारणाने ईच्छा असतांनाही मोर्चात सहभागी होऊ शकले नाही. परंतु त्यांनीही चळवळीचे नेतृत्व मान्य केले. त्यामुळे मोर्चात सहभागी झालेल्या 5⃣ ५ लाख लोकांनीच नव्हे तर जे सहभागी होऊ शकले नाही त्या दुप्पट लोकांनी सुद्धा चळवळीचे नेतृत्व स्विकारले. असे म्हणण्यास हरकत नाही. शिवाय काठावर बसून तमाशा पाहणाऱ्यांनीही १९ जुलैच्या मोर्चाच्या यशस्विततेनंतर नेतृत्वाची महती लक्षात घेऊन स्वतःचे मतपरिवर्तन करू लागले. ही संपुर्ण संख्या लक्षात घेतली तर आंबेडकरी चळवळ भविष्यात भक्कम नेतृत्वाच्या पाठीशी उभी होऊन मोठी भरारी घेऊ शकते व फार मोठा बदल घडवून आणू शकते. हे सिद्ध केले.  *निर्विवाद ते नेतृत्व मा. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांचे होते.* ही आंबेडकरी चळवळीसाठी जमेची बाजू ठरली हे मान्य करावे लागेल.

✍🏻 *आंबेडकरी अस्मिता शाबूत आहेत. आंबेडकरी चळवळीचा लढाऊ बाणा जिवंत आहे. रस्त्यावरच्या लढाया आम्ही संपविल्या नाही. आंबेडकरी चळवळ तीच्यावर होणाऱ्या आक्रमणांना तोंड देणे विसरली नाही. आंबेडकरी चळवळ हीच इथल्या व्यवस्थेवर नियंत्रण ठेऊन व्यवस्थेला नियंत्रित करू शकते.* हे १९ जूलै च्या मोर्चाने सिद्ध केले. मध्यंतरीच्या काळात गावगुंड नेतृत्वाच्या टोळक्यांनी प्रभावित होऊन चळवळीने आपली प्रभावशिलता गमावलेली होती. ती *चळवळीची प्रभावशिलता मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरी चळवळीतील नेतृत्वाने परत मिळवली.* निमित्त ठरले ते "आंबेडकर भवन". शेवटी चळवळीच्या केंद्रबिंदूवर झालेला आंबेडकरद्रोह्यांचा तो लढा होता.

✍🏻 आंदोलन केले. मोर्चा निघाला. यशस्वी झाला. निकाल काय येईल. पॉसिटीव्ह की निगेटिव्ह ? याचा विचार आंबेडकरी चळवळ कधीच करू शकत नाही. *लढणे व आंदोलनात्मक राहणे हेच आंबेडकरी चळवळीचे त्रिकालाबाधित्व आहे. आंबेडकर चळवळीची तीच उर्जा आहे. ही उर्जा साठवून ठेवता येणार नाही. ती प्रवाहीत राहण्यातच तीची प्रभावशिलता आहे.* हे इथल्या राजकारण्यापासून ते बुद्धिवंतापर्यंत सर्वांनी ओळखले पाहीजे.

✍🏻 १९ जुलै च्या मोर्चाने आंबेडकरी चळवळीचे नेतृत्वच सिद्ध केले नाही तर आंबेडकरी विचारांच्या विरोधात असलेल्या हितशत्रूंपासून ते थेट शत्रुंपर्यंत आपल्या एकजूट शक्तीचा संदेश दिला. *शिवाय कुठलिही अनुचित घटना घडू न देता बुद्धाची शांती व करूणा अंगी असल्याचा प्रत्ययही दिला. वेळप्रसंगी लढाईच्या रणांगणात रक्तपिपासू सत्तेचा गळा आवळण्याची धमकही दाखवून दिली.*

✍🏻 आंबेडकर भवन पाडणाऱ्यांना जामिन मिळेल न मिळेल. *कारण राजकीय व्यवस्थेपासून न्यायालयीन व्यवस्थेपर्यंत सर्वच क्षेत्र आंबेडकरी चळवळीसाठी पुर्णतः पोषक नाही.* परंतू आंबेडकरी चळवळीच्या १९ जुलै च्या लढ्याने व्यवस्थेला हादरा देऊन आंबेडकर भवन पाडणाऱ्यांच्या मनात धडकी भरली हे निश्चित. *आंबेडकर भवन पाडणाऱ्यांची व त्यांनी पाठीशी घालून समर्थन करणारांची समाजात मोकळे फिरण्याची दारे बंद झाली हे निश्चित.* सोबतच स्वाभिमानी चळवळ व तिचे केंद्रबिंदू श्रमदानातून व सामाजिक योगदानातून पूनःश्च उभारण्याचा घेण्यात आलेला निर्णय अनेकांच्या छुप्या स्वार्थी उद्धिष्टांना नस्तनाबूत करून उरात धडकी भरवून गेला. व खंबीर अशा *मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाची नेतृत्व क्षमता सिद्ध करून गेला.*

✍🏻 मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या ३५ वर्षाच्या राजकीय वाटचालीत राजकीय यशाबरोबर सामाजिक यशाला पुनःश्च सिद्ध केेले. *आंबेडकरी चळवळीत फक्त राजकीय वाटचाल राजकीय हेतूने न करता सामाजिक आंदोलनातून आंबेडकरी चळवळ ध्येयाप्रति घेऊन जाता येते हे मा. बाळासाहेब आंबेडकरांनी मागील ३५ वर्षाच्या कालखंडात दिलेल्या सामाजिक लढ्यातून सिद्ध केले. त्याचीच प्रचिती १९ जुलै च्या मोर्चाने पुन्हा आंबेडकरी चळवळीपुढे आली.* व आंबेडकरी चळवळीची व्यापकता परत दृष्टीपथात आली.

✍🏻 १९ जुलै ला झालेल्या मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकजूट झालेल्या आंबेडकरी चळवळीने ही उर्जा पुढील चळवळीच्या मार्गक्रमणात लावावी. शांत बसून चालणार नाही. *कारण रात्रही वैऱ्याची आहे आणि दिवसही वैऱ्याचा आहे.* त्यामुळे *डोळ्यात तेल घालून जागते रहो चा नारा आंबेडकरी चळवळीला द्यावा लागणार आहे.* आज *मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या* नेतृत्वावर ठेवलेला *विश्वास* पुढील काळात तसाच ठेऊन तो वृद्धिंगत करीत जावा लागणार आहे. आंबेडकरी चळवळीने स्विकारलेले *मा. बाळासाहेब आंबेडकरांचे* नेतृत्व समाजापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी ही आता कार्यकर्त्यांपासून ते नोकरदारांपर्यंत तर साहित्यिकांपासून ते बुद्धिवंतांपर्यंत सर्वांची आहे. आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. *आंबेडकरी चळवळ पुढील काळात मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात फलद्रुप होईल या आशावादासह थांबतो.*
___✍🏻अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

सरकारचा व मिडीयाचा पून्हा एकदा नाकर्तेपणा

💐 अभिनंदन 💐 आंबेडकर भवन प्रकरणी सरकार व व्यवस्थेला हादरविण्यात योगदान देणाऱ्या सर्वांचे... 💐 अभिनंदन 💐

👹 सरकारचा व मिडीयाचा पून्हा एकदा नाकर्तेपणा 👹

✍🏻मुंबईतून थेट - आंबेडकर भवन प्रकरणी आज मा. अॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर व भिमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वात भव्य हल्लाबोल मोर्चा विधानभवन मुंबईवर काढण्यात आला. अक्षरशः धो-धो पावसात 3⃣ ३ लाखांपेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत निघालेल्या या मोर्चाने मुंबई ची लाईफलाईन राणीबाग, भायखडा ते सिएसटी, मुंबई 5⃣ ५.०० तास भिमसैनिकांच्या आक्रोशाने बंद होती.

✍🏻या हल्लाबोल महामोर्चाचा रोष सरकारच्या नाकर्तेपणाची साक्ष होता. तसेच आंबेडकर चळवळीच्या नावावर तयार झालेले व पडद्यामागून आंबेडकरी चळवळीला उध्वस्त करू पाहणारे "अस्तिनितले निखारे" रत्नाकर व अन्य बोगस ट्रस्टी व त्यांचे पाठीराखे यांना या मोर्चाने थोबाडात चपराक हाणली. थोडीशी जरी लाज या लोकांनी टिकवून ठेवली असेल तर मोर्चात सहभागी आंबेडकरप्रेमींच्या तिव्र भावना लक्षात घेऊन व्यावसायीक व आर्थिक दुकानदाऱ्या बंद पाडाव्या. अन्यथा हाच संयमी आंबेडकरप्रेमी यांची लाईफलाईन बंद पाडू शकतो हे आज त्याने सिद्ध केले.

✍🏻आज लाखो लोकांच्या साक्षीने मा. प्रकाश आंबेडकरांच्या आदेशाने ३० जूलै पासून श्रमदानातून "आंबेडकर भवन" पुन्हा एकदा उभारले जाईल ही घोषणाही झाली. रत्नाकर व अवैध ट्रस्टी व त्यांचे पाठीराखे आता या आंबेडकरप्रेमींना श्रमदानातून आंबेडकर भवन पुन्हा नव्याने उभारतांना कुठली जेसीबी व पोकलँड घेऊन आडवे येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

✍🏻अतिषय शिस्तबद्ध लाखो आंबेडकरप्रेमींच्या उपस्थितीने झालेल्या आजच्या महामोर्च्याची इथल्या मिडीयाने पाहीजे तशी दखल न घेता परत एकदा आपली सत्ताधारीधार्जिणी मानसिकता सिद्ध केली. 3⃣ ३ लाखांच्या वर लोकांनी सहभाग घेतलेल्या या ऐतिहासिक मोर्चाला सर्वदूर समाजात व सत्ताधारी सरकारपर्यंत ही बातमी व आक्रोश पोहचायला पाहीजे होता तो पोहचला नाही. महाराष्ट १ या चँनल व्यतिरिक्त अन्य चँनलनी या मोर्चाची पाहीजे तशी दखल घेतली नाही. पण मुंबई याची साक्षीदार राहीली. या ऐतिहासिक मोर्चात सहभागी झालेले तमाम आंबेडकरप्रेमी साक्षीदार ठरले.

✍🏻मित्रांनो या ऐतिहासिक मोर्चानंतर आपली सर्व आंबेडकर प्रेमींची जबाबदारी वाढलेली आहे. यावर पुढील येणाऱ्या काळात ती पार पाडावी लागेल.
1⃣आंबेडकरी चळवळ पुढील काळात सर्वसमावेशक बनवायची असेल, आंबेडकरी चळवळीचे गतवैभव व अन्यायी, असमानतावादी सत्ताधाऱ्यांविरोधातील आक्रमकता टिकवून ठेवायची असेल तर आंबेडकरी परिवारातून आलेले वैचारिक नेतृत्वाखाली चळवळीने एकत्र व्हावे.
2⃣हल्लीच्या काळात चळवळीवर वाढलेले हल्ले थांबवायचे असेल तर आंबेडकर परिवाराच्या पाठीशी आपण सर्व आंबेडकरप्रेमींनी आजच्या महामोर्चासारखेच उभे रहावे लागेल.
3⃣तुम्ही कितीही माणसे रस्त्यावर उतरवा, कितीही आक्रोश दाखवा. परंतू मिडीया तुम्हाला समाजापर्यंत तुमचा आवाज पोहचू देणार नाही हे आज परत एकदा सिद्ध झाले. तेव्हा चळवळीने व आंबेडकरप्रेमींनी याला गांभिर्याने घेऊन जोपर्यंत आंबेडकरी चळवळ सत्तेची सुत्र हातात घेत नाही तोपर्यंत हा मिडीया तुमचा न्याय आवाज जनतेपर्यंत पोहचविणार नाही. त्यामुळे बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात चळवळीचे राजकीय व सत्तेची सुत्र मांडावे लागतील.
4⃣हा रस्त्यावरचा आक्रोश मतपेट्यांतून जोपर्यंत संघटीत रूप घेणार नाही तोपर्यंत आंबेडकरी चळवळ भविष्याची दिशा घेऊ शकणार नाही. मिडीया चा प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आज आपण बघतो. पण आंबेडकरी चळवळ जनतेचा मुख्यमंत्री आजच्या ऐतिहासिक मोर्चाच्या एकजूटीसारखाच देऊ शकतो हा विश्वास चळवळीत निर्माण व्हावा. तो विश्वास आपण निर्माण करावा.
5⃣आंबेडकर भवन परत एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने ३० जूलै नंतर उभे होईल व तेच पुढील आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू राहील. त्यासाठी आपण आजच प्रण करूयात.

✍🏻एकंदरीतच आपल्या सर्वाच्या साक्षीने आजचा हल्लाबोल महामोर्चा ऐतिहासिक झाला. मुंबई हादरली. सरकार हादरले. पोलिस प्रशासन हादरले. आंबेडकर विरोधिही हादरले व संपले. आजचा हाच मोर्चा पुढील काळात आंबेडकरी चळवळीला व आपल्या सर्वांना आंबेडकरी चळवळीत काम करायला उर्जा पुरवित राहील. हा विश्वास आहे. आंबेडकरी चळवळ परत एकदा आंबेडकर भवनातून उभारी घेईल हा विश्वासही निर्माण झाला.

🙏💐🌹 आपण सर्व साक्षीदारांचे आजच्या सफलतेचे मनपुर्वक अभिनंदन ! 🙏
___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर....