Saturday, 23 July 2016

सरकारचा व मिडीयाचा पून्हा एकदा नाकर्तेपणा

💐 अभिनंदन 💐 आंबेडकर भवन प्रकरणी सरकार व व्यवस्थेला हादरविण्यात योगदान देणाऱ्या सर्वांचे... 💐 अभिनंदन 💐

👹 सरकारचा व मिडीयाचा पून्हा एकदा नाकर्तेपणा 👹

✍🏻मुंबईतून थेट - आंबेडकर भवन प्रकरणी आज मा. अॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर व भिमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वात भव्य हल्लाबोल मोर्चा विधानभवन मुंबईवर काढण्यात आला. अक्षरशः धो-धो पावसात 3⃣ ३ लाखांपेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत निघालेल्या या मोर्चाने मुंबई ची लाईफलाईन राणीबाग, भायखडा ते सिएसटी, मुंबई 5⃣ ५.०० तास भिमसैनिकांच्या आक्रोशाने बंद होती.

✍🏻या हल्लाबोल महामोर्चाचा रोष सरकारच्या नाकर्तेपणाची साक्ष होता. तसेच आंबेडकर चळवळीच्या नावावर तयार झालेले व पडद्यामागून आंबेडकरी चळवळीला उध्वस्त करू पाहणारे "अस्तिनितले निखारे" रत्नाकर व अन्य बोगस ट्रस्टी व त्यांचे पाठीराखे यांना या मोर्चाने थोबाडात चपराक हाणली. थोडीशी जरी लाज या लोकांनी टिकवून ठेवली असेल तर मोर्चात सहभागी आंबेडकरप्रेमींच्या तिव्र भावना लक्षात घेऊन व्यावसायीक व आर्थिक दुकानदाऱ्या बंद पाडाव्या. अन्यथा हाच संयमी आंबेडकरप्रेमी यांची लाईफलाईन बंद पाडू शकतो हे आज त्याने सिद्ध केले.

✍🏻आज लाखो लोकांच्या साक्षीने मा. प्रकाश आंबेडकरांच्या आदेशाने ३० जूलै पासून श्रमदानातून "आंबेडकर भवन" पुन्हा एकदा उभारले जाईल ही घोषणाही झाली. रत्नाकर व अवैध ट्रस्टी व त्यांचे पाठीराखे आता या आंबेडकरप्रेमींना श्रमदानातून आंबेडकर भवन पुन्हा नव्याने उभारतांना कुठली जेसीबी व पोकलँड घेऊन आडवे येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

✍🏻अतिषय शिस्तबद्ध लाखो आंबेडकरप्रेमींच्या उपस्थितीने झालेल्या आजच्या महामोर्च्याची इथल्या मिडीयाने पाहीजे तशी दखल न घेता परत एकदा आपली सत्ताधारीधार्जिणी मानसिकता सिद्ध केली. 3⃣ ३ लाखांच्या वर लोकांनी सहभाग घेतलेल्या या ऐतिहासिक मोर्चाला सर्वदूर समाजात व सत्ताधारी सरकारपर्यंत ही बातमी व आक्रोश पोहचायला पाहीजे होता तो पोहचला नाही. महाराष्ट १ या चँनल व्यतिरिक्त अन्य चँनलनी या मोर्चाची पाहीजे तशी दखल घेतली नाही. पण मुंबई याची साक्षीदार राहीली. या ऐतिहासिक मोर्चात सहभागी झालेले तमाम आंबेडकरप्रेमी साक्षीदार ठरले.

✍🏻मित्रांनो या ऐतिहासिक मोर्चानंतर आपली सर्व आंबेडकर प्रेमींची जबाबदारी वाढलेली आहे. यावर पुढील येणाऱ्या काळात ती पार पाडावी लागेल.
1⃣आंबेडकरी चळवळ पुढील काळात सर्वसमावेशक बनवायची असेल, आंबेडकरी चळवळीचे गतवैभव व अन्यायी, असमानतावादी सत्ताधाऱ्यांविरोधातील आक्रमकता टिकवून ठेवायची असेल तर आंबेडकरी परिवारातून आलेले वैचारिक नेतृत्वाखाली चळवळीने एकत्र व्हावे.
2⃣हल्लीच्या काळात चळवळीवर वाढलेले हल्ले थांबवायचे असेल तर आंबेडकर परिवाराच्या पाठीशी आपण सर्व आंबेडकरप्रेमींनी आजच्या महामोर्चासारखेच उभे रहावे लागेल.
3⃣तुम्ही कितीही माणसे रस्त्यावर उतरवा, कितीही आक्रोश दाखवा. परंतू मिडीया तुम्हाला समाजापर्यंत तुमचा आवाज पोहचू देणार नाही हे आज परत एकदा सिद्ध झाले. तेव्हा चळवळीने व आंबेडकरप्रेमींनी याला गांभिर्याने घेऊन जोपर्यंत आंबेडकरी चळवळ सत्तेची सुत्र हातात घेत नाही तोपर्यंत हा मिडीया तुमचा न्याय आवाज जनतेपर्यंत पोहचविणार नाही. त्यामुळे बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात चळवळीचे राजकीय व सत्तेची सुत्र मांडावे लागतील.
4⃣हा रस्त्यावरचा आक्रोश मतपेट्यांतून जोपर्यंत संघटीत रूप घेणार नाही तोपर्यंत आंबेडकरी चळवळ भविष्याची दिशा घेऊ शकणार नाही. मिडीया चा प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आज आपण बघतो. पण आंबेडकरी चळवळ जनतेचा मुख्यमंत्री आजच्या ऐतिहासिक मोर्चाच्या एकजूटीसारखाच देऊ शकतो हा विश्वास चळवळीत निर्माण व्हावा. तो विश्वास आपण निर्माण करावा.
5⃣आंबेडकर भवन परत एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने ३० जूलै नंतर उभे होईल व तेच पुढील आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू राहील. त्यासाठी आपण आजच प्रण करूयात.

✍🏻एकंदरीतच आपल्या सर्वाच्या साक्षीने आजचा हल्लाबोल महामोर्चा ऐतिहासिक झाला. मुंबई हादरली. सरकार हादरले. पोलिस प्रशासन हादरले. आंबेडकर विरोधिही हादरले व संपले. आजचा हाच मोर्चा पुढील काळात आंबेडकरी चळवळीला व आपल्या सर्वांना आंबेडकरी चळवळीत काम करायला उर्जा पुरवित राहील. हा विश्वास आहे. आंबेडकरी चळवळ परत एकदा आंबेडकर भवनातून उभारी घेईल हा विश्वासही निर्माण झाला.

🙏💐🌹 आपण सर्व साक्षीदारांचे आजच्या सफलतेचे मनपुर्वक अभिनंदन ! 🙏
___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर....

No comments:

Post a Comment