Wednesday 29 June 2011

मी कोण ?

मी कोण ?

मी कोण ?
हा प्रश्न मला पडला.
मी साहित्तिक कि विचारवंत ?
मी लेखक कि कवी ?
माझा पिंड राजकारणी कि समाजकारणी ?
मी सेवक कि कार्यकर्ता ?
***
कुठे बसवाल मला...
मी तर सर्वच क्षेत्रात मुक्त छंद
वावरतांना दिसतो...
उत्तर मिळेल का ?...
थांब...
घाई करू नकोस  उत्तर देण्याची
इथे चौकटीत बांधून
थांबविण्यात आले प्रत्येकाला...
वाताहत केली प्रत्येक क्षेत्राची...
***
उठ...जागा हो...
चार भिंतीच्या आत लिहिलास आजपर्यंत
आता समाजात जाऊन वास्तवात लिहा
घरी बसून विचार करून विचारवंत म्हणतोस
पेर तुझ्या भविष्याच्या योजना चार चौघात जाऊन
राजकारणात जा तूझ्या योजना आणि विचार घेऊन
***
दोन घास तू खाऊन एक घास दुस-याला देतो
राजकारणी म्हणतांना लाज नाही वाटत...
तुझी कृती प्रत्येकाला समान न्यायाची असली पाहिजे.
राजकारण भल्या माणसाचे नाही म्हणून
प्रामाणिक माणसालाही बिघडवलात
अन्याय-अत्याचार, झुंड-गुंड तुम्ही बनलात
आता नैतिकतेचे राजकारण कर
कुटीलतेचे नाही, द्रव्याचे नाही
शहाण्यांचे, सुशिक्षितांचे, विकासाचे धडे गिरव समाजात
राजकारणी म्हणून जगलास आता समाजकारणी होऊन दाखव.
***
दोन लोकात राहून समाजकारणी म्हणतोस
व्याख्या तरी कळते का समाजकारणाची
वाच ! बाबासाहेब, गाडगे बाबा, तुकाराम महाराज, शाहू महाराज,
काय करायचे ? ते कळेल तुला.
समाजात वावर, समाजाचे दु: अंगावर घे
समाजाच्या वेदना तुला होऊ दे
कळेल तुला दु:खाचे आणि वेदनेचे कारण
आता लेखणी घे,
भिऊ नकोस, चिंतन कर, मनन कर,
लिहित बस उद्याच्या सूर्यास्तापर्यंत
वाट पहा उद्याच्या सूर्योदयाची समाजाच्या अस्तित्वापर्यंत.
खरा विचारवंत, साहित्तिक तूच होशील बघ.
***
मागे मागे फिरलास, पायाची काडी केलास
कधी कार्यकर्ता तर कधी सेवक बनलास
अडाण्यांमध्ये जाऊन नेताही तूच झालास
कधी कधी नेत्याला सोडून तूच तुझी बोली केलास
नेत्यांच्या लिलावात नेहमी तुझाच विजय झाला
पण नेहमी तुझाच लिलाव झाला.
आतातरी सुज्ञपणे विचारप्रवृत्त हो
तोड तुझी लाचारी, खंबीर तू हो
तूप-रोटी साहेबांसाठी तू मात्र उपाशी 
तूच यांचा जन्मदाता तूच नेहमी उपेक्षित
समाजाचा उद्धारक तूच होऊ शकते.
तूच खरा नेता, समाजकारणी होऊ शकते
***
सांग ! आता उत्तर देशील का ?
प्रत्येकाचा कुठे ना कुठे संबंध येतोच
प्रेत्येकातच दडला असतो साहित्तिक विचारवंत
समाजकारण राजकारण प्रत्येकालाच येते
सेवक कार्यकर्ता झाल्याशिवाय चळवळ चालत नाही.
तुझ्याशिवाय नेताही बनत नाही,
विचारवंत-साहित्तिक होता येत नाही.
या सर्वांची बेरीजच करा
म्हणजे गोळा होतील सर्व प्रत्येक माणसात
भूमिकाही भेटतील वेळच्यावेळी
भविष्यही घडेल उद्याचा, समाजही मजबूत होईल
तोच तू आणि तोच मी
आता सांग तू कोण ?
---
जय भीम---जय बुद्ध---कवी. प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५