प्रकाशराव
तू अंधारात दीप पेरणारा प्रकाश हो, तू प्रकाशमान हो
स्वाभिमानी बाणा तुझा, दरारा इथल्या प्रस्थापितांना
वारस तू भीमाचा, सुपुत्र यशवंताचा, युवराज तू रिपाईचा
समाज तुझ्या पाठीशी, तू दीपस्तंभ हो या मानवाचा
मंडल आयोगाचा शिलेदार तू, स्थितप्रज्ञ बुद्धांचा पाईक तू
चुटकीसरशी हाताळले रिडल्स च्या वादळाला
उत्तर नाही तुझ्या प्रश्नाला, संसदही गाजविली
बदनामीला समोर जाऊन लढा समतेचा दिला.
बुद्ध कायदा तुम्ही संसदेला दिला.
लढा जातीचा मोडून, न्यायाचा दिला.
डाऊ, भोपाल, लवासा, सेझ सर्वच तुमच्या बुद्धीच्या कक्षेत.
प्रत्येकाला मिळावा न्याय, हक्क, अधिकार हेच तुमच्या दक्षतेत.
कुणी म्हणेल ब्राम्हणांचा जावई, कुणी म्हणेल मुंजे केले
बदनामीचे षडयंत्र सारे, सारेच तुमच्या विरोधात गेले
हिंदुत्ववाद्यांचे काम तुमच्याच बांधवांनी केले.
तुम्हाला समाजापासून दूर सारले
भावांना भावापासून दूर नेले, बापाच्या मालावर गिधाडे बनले
तुम्ही मात्र सर्वांची धैर्याने तोंडे बंद केली
कर्तुत्वाने प्रगती केली, वसा जपला बाबासाहेबांचा
तुमचा अकोला पँटर्न सा-या देशात राबेल तेव्हा
सारेच म्हणतील....प्रकाशराव आले....प्रकाशराव आले....
---जय भीम---नमो बुद्धाय---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपुर.
No comments:
Post a Comment