तू तिथे आणि मी इथे...
पाऊस भिजलेल्या नभासवे तिथे आणि इथेही
कोरड्याच वाटा स्वप्नासवे तिथे आणि इथेही
ओल्याचिंब भेगा ढाळतात अश्रूंच्या धारा
तरीही का ? अजून तू तिथे आणि मी इथे...
उगाच का लपंडाव भिजलेल्या ओल्याचिंब दिवसांचा
कोसळले आभाळ आधार कशाला ठिगळांचा
ओसाड रस्त्यावर तप्त भावनांच्या पल्याड
तरीही का ? अजून तू तिथे आणि मी इथे...
हेलावणारा गारवा बुंद बुंद धरतीला कवेत घेतो
टपोर जलधारा पुरासवे ओढून नेतो
भणंग झालेल्या मातीतूनच पेरतात बीजे
तरीही का ? अजून तू तिथे आणि मी इथे...
उगाच का हा खेळ चिखलांनी माखलेल्या मनाचा
कुरतडलेल्या शरीरावर आभास कशाला प्रेमाचा
आज पडणारा पाऊस उद्या कोरड्याच धारा
तरीही का ? अजून तू तिथे आणि मी इथे...
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५
No comments:
Post a Comment