Sunday, 19 June 2011

हो तूच इथे बुद्ध....

हो तूच इथे बुद्ध....

चंद्र, तारे, फुलांसवे या मातीला मोल आले.
अवघ्या विश्वाचे शांतीदूत बुद्ध इथे जन्मले.
कणाकणात इथल्या पंचशील अवतरला.
मी कोण या जगाचा हा मार्ग मझं दिसला.

पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, कोंडी नको उद्याची
दडलेच सारे काही, दु:खात मानवाच्या
कर कम्म तू लीलया, होशील दु:ख मुक्त
मी नव्हे विधाता, ना करणार तुला मुक्त

नाही इथे चमत्कार, ना घेती पुन्हा जन्म
हेच तुझे जीवन, हे स्वीकार याच जन्मी
सत्य या जगाचे दडलेय प्रतीत्य समुत्पादात
होतेय सिद्ध सर्व काही, का उगाच करती युद्ध

अष्टांगिक असा, हा मार्ग इथे दिधला
धर्म नव्हे धम्म माझा, हो स्वतंत्र मानवा तू
दिसतेय तेच सत्य, पटतेय तेच सत्य, बुद्धी तुझीच श्रेष्ट
जीवन तुझे धम्म, कृतीत तुझा धम्म,
हो तूच इथे बुद्ध.....हो तूच इथे बुद्ध.....
प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.

No comments:

Post a Comment