पोखरले रे मलाच सारे.....
तुटक्या फुटक्या आयुष्यात माझ्या
विखुरले रे माझेच सारे.....
चीला पिलांनी मैफिलीत माझ्या
पोखरले रे मलाच सारे.....
तुकडे तुकडे वेचतांना, शोषून काटे का? मी उभाच आहे.
भरडलेल्या जीवांची, अगणित पावलांची, वाट माझी इथेच आहे.
तू का ? लढतो एकटा एकटा
मुक्या भावनांनी मी बोलत आहे.
...................
गरजले, बरसले, कोरडेच ढग नभात आले.
का ? मी उगाच रडलो, उर दाटून आले.
तुझ्यामुळे मी हरवलोच नाही.
दोष उगाच तू, का ? देत आहे.
...................
उणे दुणे काढून सारे, वा-यावरी झेप घेत आहे.
मी तिथे, तू इथेच... का ? सोसीत आहे.
तुझ्यामुळे बंध जुळला जगाचा
जगतांना मी मलाच का ? तुडवीत आहे.
....................
कळी म्हणे फुल होऊच नाही, पाकळ्या पाकळ्या गळेल आयुष्य माझे
वाचविण्या अस्तित्व माझे, का ? फुलांमध्ये गंध उरलाच नाही.
तुझ्यामुळे मी ओसाड नाही,
का ? पळसबाग माझी अंगणात आहे.
......................
किनारे नदीचे दाटून येती, हंगाम का ? कोरडाच आहे.
उगाच तू झुरतो जगाला, मुठीत माणसांच्या हे आयुष्य आहे.
तुझ्यामुळे रंग चढला नभाला,
का ? सप्तरंगीच मी साद घातील आहे.
....................
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५
No comments:
Post a Comment