Tuesday, 21 June 2011

माणूस घडविणारा कायदा

माणूस घडविणारा कायदा
 
एक चिकना चोपडा बुड्ढा लईच फार्मात आला. 
राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश सोडून 
"लोकपाल राजा" बनवाया निघाला.
संविधान, कलम, कायदा, बाराखडी येत नाही,
उर बुडवून रडतो म्हणतो
सरकार माझे ऐकत नाही.
अरे भडव्या !
कश्याला उगाच इथे तिथे नाक खुपसतो.
जनतेचा राजा जनतेलाच ठरवू दे !
भ्रष्टाचार आधी तुझ्या बाजूला ठेव.
मंदिरातली संपत्ती जनतेसाठी राखीव ठेव.
साधू, बुवा, पूजा-यांना कायद्यामध्ये बांधून ठेव. 
करायचीच असेल तर एक मागणी
ट्रस्ट च्या संपत्तीसाठी कर ना !
मंदिरातील दगडासाठी लुटणा-या भारतीयांना 
लुटण्यापासून वाचव ना !
संसद आहे देशाचा कायदा करण्यासाठी 
तू आधी माणूस घडविणारा कायदा कर !
या देशात आधी त्याची  गरज आहे.
भ्रष्टाचार संपेल असा पूर्ण विश्वास आहे.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.

No comments:

Post a Comment