Saturday, 23 July 2016

*आंबेडकरी चळवळीने नेतृत्वाची गरज सिद्ध केली.*

🇪🇺 *१९ जुलै च्या महामोर्चाने आंबेडकरी चळवळीला काय दिले.* 🇪🇺

🙏 *आंबेडकरी चळवळीने नेतृत्वाची गरज सिद्ध केली.* 🙏

🏃🏻 *१९ जुलै २०१६ ला झालेल्या मुंबई येथील मोर्चाने आंबेडकरी चळवळीसाठी नेतृत्वाची आवश्यकता व ते भक्कम नेतृत्व असेल तर त्याची उपयुक्तता सिद्ध केली.* 🏃🏻

✍🏻 आंबेडकरी चळवळीने नेतृत्व स्विकारावे. एक नेतृत्व निवडावे. नेतृत्वाशिवाय आंबेडकरी चळवळ उभारी घेणार नाही. *नेतृत्वाचे टोळके घेऊन आंबेडकरी चळवळ ध्येय गाठू शकणार नाही.* एक नेतृत्व स्विकारूनच आंबेडकरी चळवळ गतवैभव प्राप्त करू शकते. हे मागील ४-५ वर्षात मी सातत्याने मांडत होतो. लिहीत होतो. सांगत होतो. ती मांडणी १९ जूलै च्या मोर्चाने अगदी लिलया अधोरेखीत केली. हे मान्य करावे लागेल.

✍🏻 १९ जुलै ला झालेला मोर्चा हा वरकरणी सर्वपक्षीय व एकंदरीतच आंबेडकरी चळवळीचा मोर्चा होता. मी त्या मोर्चाला संयुक्त म्हणणार नाही. परंतु सुरवातीपासून (मोर्चाची घोषणा झाल्यापासूनच) या मोर्चाचे नेतृत्व मा. अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर करणार हे निश्चित होते. हा मोर्चा एका आंबेडकरी नेतृत्वात निघालेला मोर्चा होता. मा. बाळासाहेब आंबेडकर नेतृत्व करणार म्हणून त्यावर अपेक्षेप्रमाणे 👹 विरोधकांनी (आंबेडकरी चळवळीच्या विरोधकांनी) खलही केला. पण शेवटी नेतृत्वाचा निर्णय मोर्चात सहभागी झालेल्यांनी घेऊन चळवळीपुढे एक आदर्श निर्माण केला. नैसर्गिक आपत्तीमुळे (पावसामुळे) जे सहभागी (शारिरिकदृष्ट्या) होऊ शकले नाही. परंतु मानसिकरित्या त्यांनीही नेतृत्वावर विश्वास टाकून नेतृत्व निवडले. जे व्यक्तीगत कारणाने ईच्छा असतांनाही मोर्चात सहभागी होऊ शकले नाही. परंतु त्यांनीही चळवळीचे नेतृत्व मान्य केले. त्यामुळे मोर्चात सहभागी झालेल्या 5⃣ ५ लाख लोकांनीच नव्हे तर जे सहभागी होऊ शकले नाही त्या दुप्पट लोकांनी सुद्धा चळवळीचे नेतृत्व स्विकारले. असे म्हणण्यास हरकत नाही. शिवाय काठावर बसून तमाशा पाहणाऱ्यांनीही १९ जुलैच्या मोर्चाच्या यशस्विततेनंतर नेतृत्वाची महती लक्षात घेऊन स्वतःचे मतपरिवर्तन करू लागले. ही संपुर्ण संख्या लक्षात घेतली तर आंबेडकरी चळवळ भविष्यात भक्कम नेतृत्वाच्या पाठीशी उभी होऊन मोठी भरारी घेऊ शकते व फार मोठा बदल घडवून आणू शकते. हे सिद्ध केले.  *निर्विवाद ते नेतृत्व मा. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांचे होते.* ही आंबेडकरी चळवळीसाठी जमेची बाजू ठरली हे मान्य करावे लागेल.

✍🏻 *आंबेडकरी अस्मिता शाबूत आहेत. आंबेडकरी चळवळीचा लढाऊ बाणा जिवंत आहे. रस्त्यावरच्या लढाया आम्ही संपविल्या नाही. आंबेडकरी चळवळ तीच्यावर होणाऱ्या आक्रमणांना तोंड देणे विसरली नाही. आंबेडकरी चळवळ हीच इथल्या व्यवस्थेवर नियंत्रण ठेऊन व्यवस्थेला नियंत्रित करू शकते.* हे १९ जूलै च्या मोर्चाने सिद्ध केले. मध्यंतरीच्या काळात गावगुंड नेतृत्वाच्या टोळक्यांनी प्रभावित होऊन चळवळीने आपली प्रभावशिलता गमावलेली होती. ती *चळवळीची प्रभावशिलता मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरी चळवळीतील नेतृत्वाने परत मिळवली.* निमित्त ठरले ते "आंबेडकर भवन". शेवटी चळवळीच्या केंद्रबिंदूवर झालेला आंबेडकरद्रोह्यांचा तो लढा होता.

✍🏻 आंदोलन केले. मोर्चा निघाला. यशस्वी झाला. निकाल काय येईल. पॉसिटीव्ह की निगेटिव्ह ? याचा विचार आंबेडकरी चळवळ कधीच करू शकत नाही. *लढणे व आंदोलनात्मक राहणे हेच आंबेडकरी चळवळीचे त्रिकालाबाधित्व आहे. आंबेडकर चळवळीची तीच उर्जा आहे. ही उर्जा साठवून ठेवता येणार नाही. ती प्रवाहीत राहण्यातच तीची प्रभावशिलता आहे.* हे इथल्या राजकारण्यापासून ते बुद्धिवंतापर्यंत सर्वांनी ओळखले पाहीजे.

✍🏻 १९ जुलै च्या मोर्चाने आंबेडकरी चळवळीचे नेतृत्वच सिद्ध केले नाही तर आंबेडकरी विचारांच्या विरोधात असलेल्या हितशत्रूंपासून ते थेट शत्रुंपर्यंत आपल्या एकजूट शक्तीचा संदेश दिला. *शिवाय कुठलिही अनुचित घटना घडू न देता बुद्धाची शांती व करूणा अंगी असल्याचा प्रत्ययही दिला. वेळप्रसंगी लढाईच्या रणांगणात रक्तपिपासू सत्तेचा गळा आवळण्याची धमकही दाखवून दिली.*

✍🏻 आंबेडकर भवन पाडणाऱ्यांना जामिन मिळेल न मिळेल. *कारण राजकीय व्यवस्थेपासून न्यायालयीन व्यवस्थेपर्यंत सर्वच क्षेत्र आंबेडकरी चळवळीसाठी पुर्णतः पोषक नाही.* परंतू आंबेडकरी चळवळीच्या १९ जुलै च्या लढ्याने व्यवस्थेला हादरा देऊन आंबेडकर भवन पाडणाऱ्यांच्या मनात धडकी भरली हे निश्चित. *आंबेडकर भवन पाडणाऱ्यांची व त्यांनी पाठीशी घालून समर्थन करणारांची समाजात मोकळे फिरण्याची दारे बंद झाली हे निश्चित.* सोबतच स्वाभिमानी चळवळ व तिचे केंद्रबिंदू श्रमदानातून व सामाजिक योगदानातून पूनःश्च उभारण्याचा घेण्यात आलेला निर्णय अनेकांच्या छुप्या स्वार्थी उद्धिष्टांना नस्तनाबूत करून उरात धडकी भरवून गेला. व खंबीर अशा *मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाची नेतृत्व क्षमता सिद्ध करून गेला.*

✍🏻 मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या ३५ वर्षाच्या राजकीय वाटचालीत राजकीय यशाबरोबर सामाजिक यशाला पुनःश्च सिद्ध केेले. *आंबेडकरी चळवळीत फक्त राजकीय वाटचाल राजकीय हेतूने न करता सामाजिक आंदोलनातून आंबेडकरी चळवळ ध्येयाप्रति घेऊन जाता येते हे मा. बाळासाहेब आंबेडकरांनी मागील ३५ वर्षाच्या कालखंडात दिलेल्या सामाजिक लढ्यातून सिद्ध केले. त्याचीच प्रचिती १९ जुलै च्या मोर्चाने पुन्हा आंबेडकरी चळवळीपुढे आली.* व आंबेडकरी चळवळीची व्यापकता परत दृष्टीपथात आली.

✍🏻 १९ जुलै ला झालेल्या मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकजूट झालेल्या आंबेडकरी चळवळीने ही उर्जा पुढील चळवळीच्या मार्गक्रमणात लावावी. शांत बसून चालणार नाही. *कारण रात्रही वैऱ्याची आहे आणि दिवसही वैऱ्याचा आहे.* त्यामुळे *डोळ्यात तेल घालून जागते रहो चा नारा आंबेडकरी चळवळीला द्यावा लागणार आहे.* आज *मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या* नेतृत्वावर ठेवलेला *विश्वास* पुढील काळात तसाच ठेऊन तो वृद्धिंगत करीत जावा लागणार आहे. आंबेडकरी चळवळीने स्विकारलेले *मा. बाळासाहेब आंबेडकरांचे* नेतृत्व समाजापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी ही आता कार्यकर्त्यांपासून ते नोकरदारांपर्यंत तर साहित्यिकांपासून ते बुद्धिवंतांपर्यंत सर्वांची आहे. आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. *आंबेडकरी चळवळ पुढील काळात मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात फलद्रुप होईल या आशावादासह थांबतो.*
___✍🏻अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

No comments:

Post a Comment