भ्रष्टाचार लिप्त भारत देशा
भ्रष्टाचार लिप्त भारत देशा
भ्रष्टाचार मुक्त होणार काय रे !
शांतीदुताच्या भारत देशा
विकार मुक्त तू होणार काय रे !
खायला भेटूनही तुझा अण्णा आमरण करतो.
मात्र, ज्यांना भेटतच नाही त्यांच्या आमरणाचे काय ? रे !
संविधान असतांना, प्रतिनिधी असतांना, कायदा असतांनाही हे सर्व होते.
लोकशाहीचा बट्ट्याबोळ तुझ्या डोळ्याला दिसत नाही काय ? रे !
मला सांग !
माझ्या भारत देशा ! भ्रष्टाचार इथे काय ? आता आला व्ह्यय रे !
बुद्धांच्या सम्राट अशोकाने तुला सर्व आजारातून मुक्त केले होते.
विसरलास काय ? रे !
इथे वर्णवाद्यांनी अशोकाच्या बुद्धराज्याला नष्ट करून
भारतीयांविरुद्ध अघोरी भ्रष्टाचार केला.
तेव्हा तुझ्या अण्णा सारख्यांचे तोंड काय ? मसनात खुपसले होते काय ? रे !
इथल्या हरामखोरांनी, या जातीवाद्यांनी, मनूच्या अन्नौरस पुत्रांनी
भ्रष्टाचार करून बहुसंख्याकांना गुलाम केले होते.
तेव्हा काय झोपला होतास काय ? रे !
माझ्या भारत देशा !
तेव्हा तुझा अण्णा पोटं भरून ढेकर देत होता ना रे !
राजकारण्यांना वठणीवर आणण्यासाठी काय ?
गरज काय लोकपाल विधेयकाची ?
इथे देशासाठी बलिदान देण्यास तयार असणारे सुशिक्षित तरुण आहेत ना रे !
राजकारणात त्यांना आणण्यासाठी लोकजागृती विधेयक का ? आणीत नाही रे ! तुझा अण्णा !
भ्रष्टाचार फ़क़्त राजकारणातच नाही,
माझ्या भारत देशा !
भ्रष्टाचार इथल्या मुठभर लोकांच्या डोस्क्यात आहे,
भ्रष्टाचार इथल्या शिक्षण व्यवस्थेत आहे,
भ्रष्टाचार इथल्या विषमतेत आहे,
भ्रष्टाचार इथल्या बेरोजगारीत आहे,
भ्रष्टाचार इथल्या गरिबीत आहे,
भ्रष्टाचार इथल्या जातीत आहे,
भ्रष्टाचार इथल्या मुलतत्ववादात आहे,
इथे भ्रष्टाचारावर बोलणा-या प्रवृतीमधेही भ्रष्टाचार आहे.
हा भ्रष्टाचार का ? थांबविला जात नाही अण्णा !
सांग माझ्या भारत देशा !
इथे तुझा "जन लोकपाल विधेयक" काम करेल का ?
-----जय भीम----कवी- प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, मो.नं. 8793397275
mr sandeep plesae post this also in hindi then i can understand .
ReplyDeletethankyou