Thursday, 11 August 2011

समतेची लढाई

समतेची लढाई

आम्ही जगतो आहोत उद्ध्वस्त वस्तीत
प्रेतावरचे पांघरून घेऊन
झोपतो स्मशान भूमीत
जगणे इथे जमले नाही...म्हणूनच...
उद्ध्वस्थ केल्या जगण्याच्या वाटा
आता शोधतो आहोत समाधीच्या विटा
अरे ! जिवंत मुर्द्यांनो...
हि लढाई जगावेगळी आहे
तुम्ही शिपाई...पण जगावेगळेच...
जिंकण्यासाठीच लढतो प्रत्येकच लढाई
हरण्याचे गुपित सहन होत नाही.
या लढाईत मात्र...
कुणी हरणार नाही, कुणी जिंकणारही  नाही
इथे विजय होतो मानव्याचा...
तुमच्या आमच्या करुणेचा...विचारांचा आणि सर्वांचाच...
सांगा ! शोधून सापडेल का जगात कुठेतरी
अशी समतेची लढाई......
...प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.

 

No comments:

Post a Comment