माझ्या भारत देशा
माझ्या भारत देशा
काय दिलेस रे तू मला
चहुबाजूने बलत्कार आणि
लुटते आया बहिणींची लाज
देशाची शान तुझी गोरगरीब जनता
भुकेने मरते तेव्हाही होतो शरीराचाच लिलाव
स्वातंत्र्याच्या अंगावर धाऊन येतात
भडव्यांच्या जातीचे हवशी शैतान
स्वातंत्र्याची छेडखानी रोजच होत आहे
बंगल्यातल्या लखलखत्या दिव्याबत्तीत
पांढ-या नदीचा उगम होत आहे
लिव इन रिलेशनशिप ने बगीचा फुलत आहे
कित्तेक कोवड्या कळ्या इथेच दम सोडत आहेत
गरिबांच्या घरची भांडी रोजच वाजत आहेत
तीच चव्हाट्यावर आणून तू भाड खात आहे
स्वातंत्र्या आता सोड तुझा हा वेश्याव्यवसाय
नाहीतर मीच तुझ्या शिखराला
सुरुंग लावणार आहे.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.
No comments:
Post a Comment