Friday, 8 July 2011

पावसाचे गणित

पावसाचे गणित
 
पावसाची कथा काही औरच  
कधी कुठे धो धो 
तर बाकीकडे बुंद बुंद
बाकीचे मात्र पावसासाठी चातकच
जीवनाचेही असेच काही
कधी कुणाच्या आयुष्यात 
सळसळणारा पाऊस
बाकीचे मात्र सदैव कोरडेच
निसर्गाचा खेळ म्हणावा
कि माणसाची दिवाळखोरी
फरक इतकाच कि
पाऊस कोड्यात पाडतो
माणूस जिवंतपणी छळतो
उत्तराचे घोंगडे शोधाल का ?
पावसाचे गणित सुटेल का ?
---प्रा.संदीप नंदेश्वर, नागपूर.

No comments:

Post a Comment