Monday 4 July 2011

संविधानातील कलम २६ ते ३० रद्द कराव्या

मंदिरात सापडणारी संपत्ती हि देशाची संपत्ती आहे.  ती कुठल्याही देवाची व देवस्थानाची नाही.  या देशात प्रत्यक्ष चलनात असणा-या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी समानांतर अर्थव्यवस्था मंदिरातून चालविली जात आहे. जी सर्वसामान्यांच्या कोणत्याही विकासासाठी वापरली जात नसून या देशातील ५ % लोकांच्या हितासाठी वापरली जात आहे.  त्यामुळे आता मंदिरातून चालना-या अर्थव्यवस्थेविरुद्ध आंदोलन करण्याची गरज आहे.  न्यायालयाने हा पैसा सरकारी खजिन्यात जमा करण्याची ताकीद द्यावी.  तसेच पद्मनाभी मंदिरातीलाच नाही तर अन्य देवस्थानातील संपत्ती शोधून काढून ती सरकारी संपत्ती म्हणून जाहीर करावी. 

त्यासाठी संविधानातील कलम २६ ते ३० रद्द कराव्या लागल्या किंवा संविधानात सुधारणा करून त्या काढाव्या लागल्या तरी आम्ही त्यासाठी तयार असावे.  कारण या देवस्थानातील या संपत्तीचे राज या कलमांमध्ये दडलेले आहे.

तुम्हाला काय वाटते ?

No comments:

Post a Comment