माझे तत्वज्ञान
माझे तत्वज्ञान
तुम्हाला पेलवणारे नाही
कुवत तुमची नाही...! छे...!
माझाच मी मला पेलवत नाही
जीवनाच्या अगणित खांडोळ्या...
आता जागा उरलीच नाही
भग्न दिव्यापोती...
आता तेल उरलेच नाही
मी पेटलो तरी...
माझे रक्त पुरलेच नाही
वेदनेच्या ज्वराने...सुख मोजलेच नाही
यातनांच्या स्वराने...भान राहिलेच नाही
आज मी...
मानवी वस्तीच्या मध्यभागी
आता कुंपणाला...शिवार उरलेच नाही.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.
No comments:
Post a Comment