राज्य तुमच्या मुठीत आहे.
जेत्यांवर राज्य करणे कठीण असते
त्यापेक्षाही कठीण असते
पराजीतांवर राज्य करणे
कारण...
पराभवाची सल
स्वस्थ बसू देत नाही
बदल्याची आग
काही केल्या विझत नाही
बाबांच्या धम्मप्रवर्तनाने
पराभूत झाल्या वस्त्या-न-वस्त्या
वैदिकांच्या पोशिन्द्यांच्या
आता...
पलटवार होण्याचा धोका आहे.
सांगा ! स्वस्थ बसणार का ?
राज्य तुमच्या मुठीत आहे.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.
No comments:
Post a Comment