Monday 25 July 2011

उमलत्या कळीला फुलाचा भार दिला.

कळीचे फुल
 
मज वाटे कि उगाच का त्रास तुला दिला. 
नकळत उमलत्या कळीला फुलाचा भार दिला.
जीवनाच्या निराशेला कंटाळवाणा सुगंध दिला.
पलीकडच्या फुलदाणीत रुतलेल्या काट्याला 
फुलमालेतील गज-याचा सुंदर रूप दिला.
कुणाच्या तरी वेणीत रोवण्याचा मान दिला.
कळले तेव्हा मला... का ? हा आभास मज दिला.
दगडाला फुटलेल्या पाझराला हात तू दिला.
फुल काय ? तू काय ? मी काय ?
कळीचे फुल, तू चे मी हा खास मज दिला.
आज कळीचे फुल बनण्यातून जगण्याला अर्थ दिला.
दरवडणा-या प्रेमाच्या गंधाने जगण्याला बळ दिला.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.

No comments:

Post a Comment