बुद्ध शास्त्र आणि शस्त्र
कालपर्यंत शस्त्र हाती घेऊन
मी जिंकली लढाई,
काहींवर राज्य करून
ताकत वाढविली.
परंतु आता कळले
शस्त्राऐवजी शास्त्राने
माझाच घात केला.
शस्त्र सोडून
शास्त्राचाच विजय झाला
शस्त्राने काही माणसांना गुलाम केले
शास्त्राने तर बहुजन गुलाम झाले
नंतर मलाही जाग आली
जिंकण्यास मन माणसाचे
शास्त्र आहे मझपाशी
अजिंक्य जगाचे अजिंक्य असे
शस्त्र आहे मझपाशी
सांगा ! आता तुम्हीच मला
शस्त्रांनी लढायचे कि शास्त्रांनी ?
कारण
गुलामांचे नव्हे विजयाचे
अजिंक्य असे
बुद्ध शास्त्र आणि शस्त्र
आहे मझपाशी
सांगा ! तुम्हाला कोणते हवे ?
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.
"As Buddhists do not use weapons they should use their brain and the pen"-Dr. B.R. Ambedkar.
ReplyDelete