Saturday 2 July 2011

भीमबंदा शोभून दिसतो "जय गायकवाड"

अतिशय लहान वयात आंबेडकरी विचार आणि चळवळीची आत्मीयता, तन्मयता, राजकीय प्रगल्भता लाभलेले माझे लहान बंधू, आंबेडकरी चळवळीचे भविष्य जय गायकवाड यांच्या क्रांतीकार्याला माझ्या शब्दात मी दिलेली दाद !
भीमबंदा शोभून दिसतो "जय गायकवाड"
बाबांचा शिपाई,
हाती घेऊन भिमाई, 
निघाला रणमैदानी
निधळ्या  छातीचा
शूरवीर भीम शक्तीचा
कार्य तुझे सूर्या पल्याड
इथे भीमक्रांती घडविण्या 
भीमबंदा शोभून दिसतो "जय गायकवाड"
तरुणांची आण, 
समाजाची शान, 
भीम रक्ताचा बाण
तुझ्या मुठीत उद्याचा समाज, 
जय तुझे नाव,
नाही कुणी तुझ्या विजयाच्या आड
चळवळीला अजिंक्य  करण्या
भीमबंदा शोभून दिसतो "जय गायकवाड"
कार्य तुझे दीपस्तंभ 
झाली ओबीसी ची  शिष्यवृत्ती मुक्त
तुझ्या हमल्याने राज ठाकरे सैरावैर
चांगले चांगले घाबरून असतात 
तुझ्या थेट प्रश्नांवर   
न्याय तुझ्या प्रत्येक कृतीत
उजळून दिसतो प्रत्येक स्थितीत
पेटून उठतो अन्यायावर
सर्वच तुझे विचारांना धरून  
बा भीमाचा समाज घडविण्या
भीमबंदा शोभून दिसतो "जय गायकवाड"
जळतोस सदा रात्रंदिवस
झुगारून सारी मरगळ
अंधारातील दिवा तू
आंबेडकरी प्रकाशवाटेवर
चळवळीचा सशक्त खांदा तू
रिपब्लीकॅन पक्ष शिस्तीवर
रिपब्लीकॅन पँथर बनण्या
भीमबंदा शोभून दिसतो "जय गायकवाड"
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५

No comments:

Post a Comment