विचारांचे हे सुंदर आंगण...
डोंगर द-यातून वाहत सुटतो
मार्ग आपुले शोधीत असतो
वाट आपुली रान मळ्यातील
शोषून काटे कधी ना रडतील
वा-याहूनही बेभान बंदा
जिंकून येतो दुष्मनांचा किल्ला
सम्यक आहे भीम बंदा
शक्ती वाचून युक्तीने हल्ला
क्रांती रथाचे वारस तुम्ही
पेटून उठुया अन्यायावर
इतिहासाची साक्ष आम्ही
सोडूनी जाऊ आज इथल्या भविष्यावर...
होतील भग्न सारेच दुश्मन
तुझ्या रक्तामधल्या स्वाभिमानावर
तलवार नको ना हवी स्टेनगन
विचारांचे हे सुंदर आंगण...
...प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ९२२६७३४०९१
No comments:
Post a Comment