एकीकडे बाजार भरतो भर रस्त्यावरचा लिलाव
साली मादरचोद म्हणून सारेच येतात
नराधम म्हणून भूक भागवितात
हक्काचीच जागा म्हणून विकतही घेतात
चालता बोलता नजरेतून अंतर्बाह्य छळतात
हवेलीतल्या बाजाराला सोसायटी म्हणतात
उघड्या फिरल्या तरी फ्याशन म्हणतात
रात्रीच्या अंधारात दिवे लाऊन जगतात
सकाळी मर्सिडीत थाटातच मिरवतात
बघायचेच तर त्यांना बघा
पोट भरूनही फ्याशन च्या बाजारात
स्वतःला विकतात,
पुनर्वसनाच्या नावाखाली धंदा करीत फिरतात.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.
No comments:
Post a Comment