Wednesday 13 July 2011

बालीवूड फिल्मसृष्टी बहुजनांसाठी धोकादायक !

बालीवूड फिल्मसृष्टी बहुजनांसाठी धोकादायक ! 
        फिल्म, रेडीओ, दूरदर्शन हि सर्व मनोरंजनाची माध्यमे असली तरी त्यातली वास्तवता फार वेगळी आहे.हे  लक्षात घेतल्याशिवाय अश्या माध्यमांना सामाजिक जीवनातले स्थान निश्चितपणे देता येत नाही. मनोरंजन एक क्रांती असली तरी या क्रांतीने बहुजन समाजात कुठली क्रांती घडवून आणली आहे. हा संशोधनाचा विषय आहे.   त्यामुळे वास्तव आणि कुठलीही फिल्म याचा तिळमात्र संबंध यात नाही. आला तरी वास्तव कमी आणि कल्पनाविश्व जास्त असाच काहीसा प्रकार पहावयास मिळाला.  मराठी फिल्म मध्ये काही प्रमाणात वास्तव अधून मधून पहावयास मिळते.  परंतु वास्तव रंगविताना केली गेलेली नुसती उठाठेव त्यातील विषयाचे गांभीर्य कमी करते. 
       अश्या पार्श्वभूमीवर जर कुठले वास्तववादी चित्रपट प्रकाशित झाले असतील तर ते म्हणजे अमीर खान यांचे  "तारे जमीं पर" आणि "थ्री इडीएट" या दोन्ही चित्रपटांनी अगदी व्यवस्थेच्या मुळावर हात घातला आहे. आणि निश्चितच येणा-या पिढीला दिशा देणारे आहे असे मला वाटते. मी काही चित्रपटांचा चाहता नाही. त्यामुळे मी ते बघतही नाही. परंतु हे दोन चित्रपट माझ्या मनातल्या भावनांना वास्तवात उतरवितांना पाहून मी अमीर खान चे धन्यवाद देतो.  प्रकाश झा सामाजिक प्रश्नांना हात घालतात हे सत्य असले तरी त्यातील अवास्तव चित्रण मनाला पटण्यासारखे नसते. एवढे मात्र निश्चित.
  
बालीवूड नावाने निर्माण झालेली हिंदी चित्रपट व्यवस्था आज येणा-या पिढीला एका विचित्र व्यवस्थेकडे घेऊन जात आहे. चित्रपटातील सामाजिक आशय बाजूला जाऊन असामाजिक तत्वांचा सूळसुळाट जास्त आहे. हि बालीवूड व्यवस्था समाजाला वास्तवाकडून येणा-या पिढीला परावृत्त करीत आहे. अंगावर कपडे नसणे म्हणजे फ्याशन...अशी फ्याशनवादी व्यवस्था समाजाला कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही.  काळ फेसबुक वर एका मित्राच्या प्रोफाईल वर उगडा नागडा फोटो होता आणि तोंडात जय भीम...जय बुद्ध होते.  त्याला प्रोफाईल फोटो बदलायला सांगता बरोबर..."हे आमचे फ्याशन यात कुणी हस्तक्षेप केलेला  आम्हाला आवडणार नाही". हे उत्तर ऐकून मी सुद्धा अचंभित झालो.  बहुजन समाजातील मुलांवर असले  परिणाम करणारी हि माध्यमे खरेच या समाजासाठी काय मार्गदर्शन करणार ?
         मनोरंजन सृष्टी आज सेलिब्रिटी समाजाचे उद्योग आहे. या सृष्टीतील प्रत्येक सेलिब्रिटी स्वतःचा  व्यवसाय म्हणून त्याकडे पाहतो. उच्चभ्रू सोसायटी ची त्यांना साथ भेटते. परंतु त्याचा बहुजन  समाजावर कुठला परिणाम होत आहे. याकडे बहुजन समाज डोळेझाक करून स्वतःला सेलिब्रिटीसारखा बनवू  पाहत आहे.  त्यातून आमच्या राहण्या, खाण्या, पिण्यात काय बदल होत आहेत. आमचे जीवनाचे  अर्थशात्र किती बिघडत चालले आहे. याचा साधा विचारही आमच्या मनात येत नाही. हा मोठा धोका आहे बहुजन समाजासाठी. हि सेलिब्रिटी व्यवस्था सर्वसामान्यांना न्याय देणारी नाही. आज प्रत्येक सेलिब्रिटी एन जी ओ चालवितात. त्याकडे आपण मोठ्या आशेने बघतो. परंतु तोही एक त्यांचा  व्यवसायच आहे. बहुजन समाजाला लुटण्याचा. इथे कुठेही तळागाळातल्या माणसाचा विचार होतांना दिसून  येत नाही.
       बहुजन समाजाजवळ आज अशी कुठलीही सिनेसृष्टी का नाही. गांधी तत्वज्ञानावर (आहे कि नाही यातच शंका आहे) हित फिल्म बनतात. परंतु कुठलाही फिल्म निर्माता परिवर्तनवादी तत्वज्ञानावर फिल्म का तयार करीत नाही. कारण एकाच आहे. परिवर्तनवादी तत्वज्ञानावर फिल्म तयार झाल्या तर झोपलेला बहुजन समाज जागा होईल. आणि ती यांच्यासाठी धोक्याचे होईल. म्हणून आता स्वतःला परिवर्तनवादी म्हणवून घेणा-यांनी एकत्र येऊन परिवर्तनवादी फिल्मसृष्टी निर्माण करावी. यावर किती लोक विचार करतात.? हे माहित नाही.   पण तो आम्हाला करावा लागणार आहे.  

No comments:

Post a Comment