Thursday, 28 July 2011

कश्यासाठी ?

कश्यासाठी ?
 
माणूस जगतो कश्यासाठी ?
पाठीवर लाथ आणि पोटावर वार
झेलतो कश्यासाठी ?
जगण्याचा खुर्दा आणि
जीवनाचा मुर्दा
करतो कश्यासाठी ?
बेचिराख वस्तीतील वास्तव्य 
शोधतो कश्यासाठी ?
भावनाशुन्य माणसांच्या संगतीत 
राहतो कश्यासाठी ?
माणसांचा माणसांवरील अन्याय 
सहतो कश्यासाठी ? 
उध्वस्त आयुष्याचे कांगोरे
पिटतो कश्यासाठी ?
माणूस असून हैवानांच्या रांगेत
बसतो कश्यासाठी ?
शिक्षित असून...बेरोजगार शैतान...
मानवी बॉम्ब
बनतो कश्यासाठी ?
स्वतः बरोबर समाजाची वासलात
लावतो कश्यासाठी ?
निडर होऊन छातीवर गोळ्या 
झेलतो कश्यासाठी ?
हरूनही...जिंकण्याचा आव 
आणतो कश्यासाठी ?
पुन्हा एकदा विचारतो 
माणूस जगतो कश्यासाठी ?
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.

No comments:

Post a Comment