उद्याचा कुणी तरी बाबासाहेब
पुस्तकाला.......
प्रस्तावनेच्या भानगडीत
मी आता पडणार नाही.
कारण.........
तेथेही देण्या घेण्याची
मांडवली केली जाते.
देता का हो साहेब ! म्हणून...
वेठबिगारीच करावी लागते.
काय करणार ?... नवीन आहे ना !
आता ठरवले......
हि लढाई...
एकट्यानेच लढायची...
माझ्यासाठीही... आणि...
माझ्या येणा-या नव्या पिढीची...
कोण जाणे ?... उद्याचा कुणी तरी बाबासाहेब घडणार आहे.
जिंकणार कि हरणार...
आता वाचकांनीच ठरवायचे...
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.
No comments:
Post a Comment