Monday, 23 May 2011

देवालये : भारतीयांची शोषणकेंद्रे


देवालये : भारतीयांची शोषणकेंद्रे

भारतात जितकी लोकसंख्या आहे, तितक्याच प्रमाणात देवांचीही  संख्या आहे. वैदिक धर्म आणि मानवतावादी धर्म यांच्यातला संघर्षही पुरातन कालपासून चालत आला आहे. तथागत बुद्धांनी वैदिक धर्माने निर्माण केलेल्या चैतन्यवादी परंपरेला मुठमाती देऊन इहवादी अश्या मानवतावादी धर्माची शिकवण दिली. मानवतावाद जगाच्या कानाकोप-यात पसरु लागला होता. याची धड़की घेउन वैदिक धर्ममार्तंडानि या देशात ३६ कोटि देवांचे राज्य  निर्माण केले. देवापुढे नतमस्तक होणारी बिनडोकांची फळी निर्माण केली. माणसाला दगडाच्या देवावर मस्तक फोडायला भाग पाडले. श्रद्धा आणि विश्वास या नावावर लोकांचा बुद्धिभ्रंश केला. मनु सारख्या काल्पनिक पात्राला उभे करून चातुरवर्ण्य व्यवस्था समाजावर लादली. श्रेष्ट आणि कनिष्ठ अशी मांडणी करून जातिवादी व्यवस्था निर्माण केली. त्याचेच भुत आजच्या पिढीवर आणि समाजावर बसलेले आहे.

भारताचा गरिबीमध्ये जगात क्रमांक लागतो. आजही भारतातील बहुसंख्य जनता मुलभूत विकासापासून अलिप्त आहे. दारिद्र्य  रेषेखाली जगणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वेळचे सकस अन्न मिळाल्याने इथे भूखमरी ने लोक दगावत चालले आहेत. अठराविश्वे दारिद्र्यात जगणारी माणसे आजही त्याच परिस्थितीत जगात आहेत. कुपोषण इथल्या गरिबांच्या पाचवीलाच पुजला गेला आहेअशी जणू काही काळ्या दगडावरची रेघ  या   देश्यातल्या दैवावाद्यांनी ओढली आहे. पूर्वजन्माचे पाप-पुण्य याची गोळाबेरीज करता करता भुकेने लोक मरतांना दिसतात. एकीकडे खाऊन खाऊन माजलेली माणसे जिभेचे चोचले पुरविण्यासाठी पंचतारांकित  हॉटेल चा आधार घेतात. तर दुसरीकडे फेकलेल्या अन्नावर पोट भरतांना चिमुकली पोरे एकदुस-यावर तुटून पडतात. इतकी प्रचंड विषमता या  संत, महात्म्यांच्या देश्यात पाहायला मिळावे.  यासारखी दुसरे आश्चर्य जगात शोधूनही सापडणार नाहीकदाचित हेच इथल्या जातीवादी मानसिकतेला पाहिजे होते. म्हणूनच तर जाणीवपूर्वक हि परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे.

इथल्या माणसाचे दरडोई उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र इथली देवालये उत्पन्नाच्या  क्षेत्रात जगात क्रमांक  वर आहेत.  देवालयांचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याचा विचार कधी कुणी केला आहे का ? गरिबी वाढत आहे. बेरोजगारी वाढत आहेआर्थिक विषमता वाढत आहेतत्यातून वाढणा-या   सामाजिक  विषमतेमुळे समाजात जगणे कठीण झाले आहे. माणूस हवालदिल होऊन मृत्युच्या सापड्यात  स्वतःला  गुंतवून घेत आहे. पर्याय नाही म्हणून शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत आहे. मुलभूत सुविधांपासून वंचित असणारा समूह व्यवस्थेविरुद्ध पेटून उठण्यास प्रवृत्त झाला आहे. त्यासाठी तो नक्षलवादी  चळवळीकडे   आकृष्ठ होत आहे. समस्या आणखीच भीषण रूप  धारण   करीत आहेइथे चालना-या राजकारणासाठी, जातीवादासाठी कधी कुणाचा बळी दिला जाईल. हे सांगता येत नाही. आजही स्वातंत्र्याच्या ६५  वर्षांच्या काळात समाज असुरक्षितच आहे. कधी कुण्या आदिवासी, दलित, अस्पृश्य स्त्रीच्या शरीराची विटंबना केली जाईल; कधी कुणी जातीचा नराधम तिच्या आयुष्याचे वाटोळे करेल याचेहि  सोयरसुतक  कुणाला  नाही. समाजात सुटलेल्या राजकीयजातीयधार्मिक . नराधमांकडून  समाज सतत लुटला जात आहे. पिळला जात आहेसमाजात सुटलेल्या या पिसात कुत्र्यांवर आवर  कोण घालणार ? समाजाला सुरक्षितता कोण देणार ? सर्वांचे हक्क-अधिकार केव्हा सुरक्षित होणारया सर्व प्रश्नांची उत्तरे  इथल्या  प्रत्येक  भारतीयाला  द्यावी  लागणार आहे.

एकीकडे हि सामाजिक परिस्थिती तर दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. महागाईने  सर्वसामन्यांचे कंबरडे मोडले आहेवेतनभोगी समाज वेतन आयोगाने टाकलेल्या तुकड्यांवर  खुश होऊन मरता मरता जगत आहेआणि जगता जगता हि मरत आहे !  परंतु मजूर, कामगार यांनी काय करावे. नाही त्यांच्या मजुरीत वाढ आणि नाही हाताला मिळणा-या कामात वाढ ! तोही तेच खातो जो इथला वेतनदार, श्रीमंत, राजकारणी, उद्योगपती खातो. रोजच्या जगण्यासाठी लागणा-या वस्तू त्यालाही त्याच किमतीत घ्याव्या लागतात. मग तो कसा खात असेल ? कसा जगात असेल ? याचा कधी विचार केला आहे का ?  पैसा तुमच्याकडे येतो. रक्त मात्र त्याचे शोषले जाते.

भारतात दोन अर्थव्यवस्था समानांतर काम करीत आहेतएक अर्थव्यवस्था दृश्य स्वरुपात भारतीय अर्थव्यवस्थेचे  प्रतिनिधित्व करते. तर दुसरी अर्थव्यवस्था अदृश्य स्वरुपात जातीचे, धर्माचे प्रतिनिधित्व करते. हीच अर्थव्यवस्था म्हणजे देवालयातून चालणारी अर्थव्यवस्था होयहिंदू धर्माने देवाचे बांडगुळ  लोकांच्या मस्तकी  असे काही बिंबविले आहे कि खायला मिळाले नाही तरी चालेल परंतु इथला माणूस देवाच्या देवळात जाऊन दगडाच्या मूर्तीला पारायण घालतो. खिश्यात दमडी नसतांना नवस फेडतो. घर गहाण ठेऊन सत्यनारायण करतो. भट-ब्राम्हणांचे  लाड आणि चोचले पुरवितो. स्वतः भिकारी होतो. आणि लाल टिळा चंदन मस्तकी लावलेल्या चोराला घरातील असेल नसेल ते लुटून देतो. उधार उसनवारी करून देव दर्शन करतो. कधी चेंगराचेंगरीत मरतो. तर कधी दर्शनावरून येतांना देव पावला नाही म्हणून कुत्र्यासारखा रस्त्यावरील अपघातात मरतो. दगडाच्या देवाला मात्र कधीच पाझर फुटत नाही. कधीच धाऊनहि येत नाही. मात्र "हजारो माणसांतून एखादा वाचला तर देव पावला" म्हणून पुन्हा त्याला देवाच्या भक्तीकडे घेऊन जाणारे महाहरामी हरामखोर महाभाग गल्ली गल्ली आणि रस्त्या-रस्त्यात पावलो-पावली दिसूनच येतात.

भारतात माणसाच्या दरडोई उत्पन्नातील जवळपास ४० ते ५० % उत्पन्न दर वर्षी फक्त देवाच्या नावाने खर्च केला जातो. कारण यांच्या मेंदूच्या कप्प्याकप्प्यात तो इतका ठाण मांडून बसला आहे कि, जीवनाच्या प्रत्येकच घटना आणि घडामोडीमागे त्याला देवच दिसतो. देवाशिवाय त्याला दुसरे काही सुचतच नाही. गल्ली बोलतील मंदिरे आणि देवालये हे त्याचेच प्रतिक आहे. शहर असो  गाव-खेडे सकाळ संध्याकाळ टाळ कुटत बसणारी मंडळी क्षणाक्षणाला दिसून येतीलटाळ कुटण्यासाठी त्यांना वेळ असतोपरंतु शेजा-याला मदत करण्यासाठीगरजवंताला मदत करण्यासाठी, भटकलेल्याला रस्ता दाखविण्यासाठीही यांच्याकडे वेळ नसतो. अशी हरामखोर माणसांची पिलावळ कुणी पैदा केली ? इथल्या जातीवाद्यांनी, मनूच्या अनौरस पुत्रांनी... दगडातून, मातीतून जिवंत माणूस पैदा करणा-या राक्षसी महाभागांनी...

पोरगा पास झाला तर देव पावला; नौकरी लागली तर देव पावला; काम मिळाले तर देव पावला; पोरगा पैदा झाला तरी देव पावला; घामाच्या धारा सांडून सांडून मिळणारी मिळकत मिळाली तरी देव पावला; कारण त्यातही त्याचाच वाट म्हणून देवाला उपरती घालणारी माणसे कधी तरी स्वतःच्या कष्टाचे मोल समजतील का ? बुद्धाने दिलेला प्रत्तुत्य समुत्पात यांना अजूनही कसा कळला नाही ? कि तो जाणीवपूर्वक कळू दिला नाही ?

इथली गरिबी इथल्या देवालयाने निर्माण केलेली आहे. इथली बेरोजगारी देवालयाने निर्माण केली आहे. इथली महागाई देवालयाने निर्माण केली आहे. इथली विषमता आणि दहशतवाद देवालयाने निर्माण केला आहे. सामाजिक विषमता आणि सर्वसामान्यांचे शोषण देवालयाने केले आहे. मिळकत कितीही असो देवाचा/देवालयाचा वाटा मात्र निश्च्छित झालेलाच असतो. देश देशोधडीला लागत चालला आहे. गरिबांना राहायला छत, घालायला कपडे, आणि खायला अन्न नाही.  मात्र देवालयात चहुबाजूने सोन्याने मढलेल्या दगडांच्या भिंती, सदैव दरवडणारा सुगंध आणि सर्वसामान्यांच्या जीवनात अंधार करून सतत जळत राहणारी वीज. कुठून येते हे सर्व ? तुमच्या आमच्या घामातून, आटविलेल्या रक्तातून हे सर्व दगडांच्या देवांना आणि देवालायांना मिळते. तुम्ही मात्र अजूनही तसेच कफल्लक का दिसता ? तुम्ही आजही फाटक्या कपड्यांचाच आधार का घेता ? देवालये चकाकत आहेत तुमची घरे मात्र अजूनही धुळीनेच माखलेली आहेत. देवळातील देवाच्या आणि देलालयाच्या शिरावर सोन्याचा मुकुट आहे. तुमचा निवारा कुणी छीनला आहे ?  याचा शोध घ्या

जगण्यासाठी लागणा-या मुलभूत सोई सुविधा तुम्हालाही मिळाव्यात.  हा तुमचा अधिकार आहे. तसा तुमचा हक्कही आहे. परंतु दगडावर होणारा खर्च वजा करता तुम्हाला यापेक्षा वेगळे मिळेल तरी काय ? मग ते मिळविण्यासाठी  तुम्ही आडमार्गाचा वापर करता. चोरीडाके, लुटमार, भ्रष्टाचार कश्यासाठी ? कारण तुम्ही कमाविलेली मिलकर  अर्ध्यापेक्षा जास्त देवालयात खर्च होत असेल तर यापेक्षा तुम्ही वेगळे करणार तरी कायजगण्याशी सम बांधण्यासाठी अश्या मार्गाचा वापर करून तुम्ही जगू पाहता. आणि त्यात सापडू नये म्हणून पुन्हा देवाचेच  नामस्मरण करता. हा सर्व खटाटोप कश्यासाठी ? या देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याचा चंग बांधणारेही  तुम्हाला देव  देवळाच्याच नावावर लुटतातत्यांचेच बळी पडून तुम्हीही समाजसेवेचे भूत तुमच्या अंगात शिरविता. परंतु भ्रष्टाचार करणारे शेवटी हा भ्रष्टाचार देवालयाला दान देण्यासाठीच करतात ना ? शिर्डी, बालाजी, सत्य साई बाबा यांच्या  जवळ असणारी करोडो अब्जो रुपयांची संपत्ती कुटून आलीयांनीच दिली आहे ना ? उपाशी, उघड्या नागड्या पोराला  हाकलून लावणारे आणि श्रध्येच्या नावावर अनैतिकता पोसना-या महाभागांना शेवटी संरक्षणही तुम्हीच देता ना ?

केव्हापर्यंत चालणार आहे हा भारतीय समाजाच्या शोषणाचा गोरखधंदा ? देवालयातून चालणारी समानांतर अर्थव्यवस्था समाज आणि देश विकासाच्या कमी येईल का ? कि काही लोकांच्या अय्याशीसाठी समाज स्वतःला लुटणार आहे. लुटवून देणार आहे. आतातरी भानावर या ! देवालयातील दिवे विझवून प्रत्यक्ष माणसांच्या आयुष्यात  प्रकाश करा ! देवालयात जमा असणारी संपत्ती गरिबांच्या उत्थानासाठी लावा ! देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी, त्यांच्या हाताला काम मिळेल यासाठी प्रयत्न करा ! देव देवळे उध्वस्त करून माणसांना राहण्यासाठी जागा द्या ! सर्वसामान्यांचे हाल अपेष्टा सहन करता करता होणारी आयुष्याची वाताहत तुमच्या नाकर्तेपनाचीच साक्ष देत आहे. हे लक्षात घ्या ! देवाच्या नावावर चालना-या सण-सणावारांतील होणारी पैसा, वीज . उधळण थांबवाप्रदूषणाला थांबवा ! देवालयांच्या जागी वसतिगृहे निर्माण करा ! माणूस हाच तुमच्या मेंदूच्या क्षितिजावर कायमचा कोरून ठेवा ! माणूस म्हणून तुमचे भविष्य तुमच्याच हातात आहे. याचा जरा विचार करा ! माणूस वाचवादेश वाचवा
-----प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.

No comments:

Post a Comment