Thursday 26 May 2011

दलित ब्राम्हणवाद : एक धोका

दलित ब्राम्हणवाद : एक धोका

बाबासाहेबांच्या प्रेरणेने हा समाज बुद्धिवादी झाला. शक्तिहीन समाज बलवान झाला. शब्द नसलेल्या मुखातून क्रांतीचा जयघोष निनादलापंख छाटलेल्या पक्ष्यांनी उंच उंच भरा-या घेतल्या. श्वास नसलेल्या शरीरात प्राणवायू तरळू लागलाझोपेतून जागा हा समाज जागा झाला. छीणले गेलेले हक्क-अधिकार परत मिळवण्यासाठी क्रांती करू लागलाचातुरवर्ण्य व्यवस्था नाकारू लागला. अस्पृश्यता झुगारून दिली. जातीवाद्यांनी 'दलित' नावाने हिणवून दिलेली शिवी यांनी नाकारून मानवतावादी प्रवाहात आपली ओळख बदलली. इथेच कुठेतरी या जातीवाद्यांच्या पोटात दुखू लागले. हक्काचे गुलाम  यांच्याविरुद्ध पेटून उठलेविदेशी पारतंत्र्य यांनी घालवून दिले आणि स्वातंत्र्य  प्राप्त केलेपरंतु हजारो वर्षे ज्या स्वकीयांवर यांनी राज्य केले. त्या स्वकीयांच्या स्वातंत्र्याचे काय ? असा प्रश्न करून बाबासाहेबांनी या जातिवाद्यांना दिलेला शह बहुसंख्य समाजात उर्जा निर्माण करून गेला. हा समाज पेटून उठला. हिंदूंच्या जाळ्यातून मुक्त होण्यासाठी धडपडू लागला. आपली खरी ओळख पुन्हा प्राप्त करण्यासाठी वाट पाहू लागला.

अखेर तो दिवस उजाडला. १४ ऑक्टोंबर १९५६. बुद्धाच्या धरतीवर पुन्हा एकदा धम्मचक्र गतिमान झाले. बुद्धाच्या क्रांतीवर प्रतिक्रांती करून इथल्या बौद्धांना जातीवाद्यांनी अस्पृश्य-मागास-आदिवासी बनविले होते. त्यावर पुन्हा एकदा क्रांती करून बाबासाहेबांनी त्यांची खरी बौद्ध हि ओळख प्राप्त करून दिली.  'संपूर्ण भारत बौद्धमय करेन' अशी भीमगर्जना करून जातीवाद्यांच्या छाताडावर लात मारली. दलितत्व झुगारून बौद्धात्व पत्करले. या क्रांतीला कुणीच उत्तरे देऊ शकले नाही. अनेक प्रयत्न करूनही हि क्रांती रोखू शकले नाही. प्रस्थापितांनी, जातीच्या, धर्माच्या ठेकेदारांनी या क्रांतीला हाणून पडण्याचा प्रयत्न केलासावरकर सारख्या हिंदू दलालाने थोडाफार प्रयत्न करून पहिला. परंतु स्वतःच्याच थोबाडीत मारून बसला. लाखो लोकांनी बाबासाहेबांसोबत नागपूर नगरीत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. अस्पृश्य-दलित म्हणून चिकटलेली जळमटे कायमची फेकून दिली. स्वकीय गुलामीतून स्वतंत्र झाल्याचा आनंद चेह-यावर तरळू लागला. गुलामीतून, शोषणातून मुक्त होऊन न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हि तत्वे अंगिकारली. माणूस म्हणून हरविलेली ओळख प्राप्त झाली.

परंतु डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वानानंतर हा समाज पुन्हा पोरका झाला. बाबासाहेबांच्या अनुयायांनी समाजाची धुरा आपल्या खांद्यावर घेण्याचा प्रयत्न केला. समाजाला सुरक्षितते सोबत  संविधानाने  बहाल केलेले हक्क-अधिकार टिकवून ठेवणेसमाजाच्या विकासासाठी व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे. इतकेच नाही तर बाबासाहेबांच्या अपूर्ण स्वप्न  ध्येय्यांना पूर्ण करण्याची जबाबदारी यांच्यावर येऊन पडलीकाही काळ त्यांनी हा लढा, हि जबाबदारी समर्थपणे पार पाडली. परंतु इथल्या प्रस्थापितांनी, जातीवाद्यांनी, हिंदू धर्म मार्तांडांनी त्यांना फूस लावून बहकविण्याचे षड्यंत्र आखलेया षडयंत्राला काही बळी  पडलेपरंतु काहींनी स्वाभिमानाने आपला लढा सुरूच ठेवला होता. शिक्षणातून या समाजाने आपली प्रगती घडवून आणली होतीशिक्षणाच्या  बळावर  व्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात यांनी शिरकाव केला होता. या समाजाची लेखणी तडपू लागली होती. व्यावास्थेणी केलेल्या अन्यायाला वाचा फुटू लागली होती. शोषणअन्याय, अत्याचारषडयंत्रची  चिरफाड होऊ लागली होती. एक नवीन साहित्य प्रवाह १९६० च्या काळात या समाजाच्या लेखणीतून जन्माला आलाप्रस्थापितांच्या, जातीवाद्यांच्या, धर्मवाद्यांच्या भविष्यासाठी तो एक मोठा धोका बनू पाहत होता. हा धोका ओळखून प्रस्थापितांनी या नव्या साहित्य प्रवाहाला 'दलित साहित्य' असे नाव देऊन भविष्यातल्या क्रांतीला जागीच संपविले. फेकून दिलेले दलितत्व पुन्हा त्यांना बहाल केले. दलित लेखक, कवी, साहित्यकार म्हणवून घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला. समानता स्वीकारलेल्या समाजाच्या मुखात दलित हा शब्द पुन्हा पुन्हा रेंगाळत ठेऊन एका मोठ्या क्रांतीचा उगम होण्याआधीच त्या क्रांतीचा अस्त केला.

दलित ब्राम्हणवादाची सुरवातही इथेच झाली. बाबासाहेबांना उणा करून माणसांना मोठे करण्यात आले. विचारांना बाजूला सारून माणसे मोठी झाली. सर्व सुख उपभोगू लागली. सामाजिक अन्यायाची झळ त्यांना पोहोचलीच नाही. कारण ते प्रस्थापित जातीवाद्यांचे भविष्यकाळातील भांडवल होते. त्यांच्याच  बळावर या प्रस्थापितांना आंबेडकरी चळवळ आणि बुद्ध धम्माचा काफिला गोठवून धरायचा होता. बुद्ध-आंबेडकरी अशी मिळालेली ओळख दूर सारून दलितत्व चिकटवून ठेवायचे होते. याही परिस्थितीत बाबासाहेबांनी रोवलेल्या बुद्धाच्या बोधीवृक्षाला पालवी फुटू लागली होती. बुद्धांचा धम्म  गतिमान होत होता. बुद्ध संस्कृती रुजायला लागली होती. सर्वसामान्य माणसे बाबासाहेबांनी केलेल्या धम्मक्रांतीकडे आकर्षित होऊ लागली होती. बाबासाहेबांवर अतीव निष्ठा असणारा समाज बाबासाहेबांच्या चळवळीचेबुद्धाच्या धम्माचे प्रचार  प्रसार करणा-यांकडे आशेच्या नजरेने पाहत होते. त्यांना आपला पाठींबा देत होते. हि बाबासाहेब आणि धम्मवरील समाजाची निष्ठा हेरून इथल्या जातीवाध्यानी काही म्होरके या समूहात सोडलेज्यांनी बाबासाहेब आणि बुद्धाचे नाव घेऊन समाजाचा बुद्धिभ्रंश  केलासमाजाने सत्य असत्याची पारख  करता बाबासाहेबांवरील निष्ठेपोटी अश्या म्होरक्यांना साहाय्य  केले. आंबेडकरी वेश परिधान केलेले हे गुप्तहेर आंबेडकरी समाजात अतिशय शिस्तबद्ध रित्या हिंदूवाद्यांचे काम करू लागले. आणि बाबासाहेबांच्या क्रांतीला संपवू लागलेभारत बुद्धमय करण्याचा प्रवाह  गोठवून धरला.

हे गुप्तहेर होते पुण्यातून उगवलेले रजनीश, ओशोआणि मुंबईत उगविलेले गोयंका मास्तर. ज्यांनी बुद्ध धम्माला दुषित करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी दिलेला शुद्ध बुद्ध त्यांनी लिहिलेल्या  "बुद्ध आणि त्यांचा धम्म" यात शब्दबद्ध असतांनाही त्याला नाकारून यांनी अवतारवादी, समाधीनस्थ, चैतन्यवादी बुद्ध लोकांमध्ये पसरविण्याचा प्रयत्न केलाडॉ. बाबासाहेब 'बुद्ध आणि त्यांचा धम्मला लिहिलेल्या प्रस्थावनेत म्हणतात, "बुद्धाच्या क्रांतीनंतर बुद्ध धम्मात काहींनी जाणीवपूर्वक शिरकाव करून धम्माला विद्रूप करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बुद्धांच्या धम्माला काही छिद्रे पडली होती. त्या छिद्रातून  घाण पाणी आत येऊन बुद्धांचा धम्म प्रदूषित झाला होता. ती सर्व छिद्रे बुजवून शुद्ध रूपातील बुद्ध आणि त्यांचा धम्म मी तुमच्यासमोर  मांडीत आहे." हा बाबासाहेबांचा संदेश झुगारून प्राचीन प्रदूषित झालेला बुद्ध पुन्हा समाजात पेरण्याचा जणू विडाच रजनीश, ओशो, गोयंका यांनी घेतला.   आर एस एस आणि व्ही एच पी यांनी अतिशय शिस्तबद्ध रित्या त्याचे संचालन केलेसमाजाला अंधारात ठेऊन यांनी बाबासाहेबांच्या धम्मप्रवर्तनालाच  संपविण्याचे  कारस्थान रचले. 'विपश्यना', 'संभोग से समाधी तक' हि त्याचीच प्रतिरूपे आज समाजात रुजलेली दिसून येत आहेत. धम्मक्रांतीला मारक  अश्या सर्वच  स्थरातून बाबासाहेबांच्या 'भारत बुद्धमय' करण्याच्या मोहिमेला थोपवून धरले. धम्मक्रांती त्यामुळे किती प्रभावित झाली आहे आज त्याचा  प्रत्यय दिसून येत आहे. मागच्या ५० वर्षाआधी बाबासाहेबांच्या महापरीनिर्वानानंतर जातीवाद्यांनी आखलेले षड्यंत्र आज २१ व्या शतकात वास्तवात उतरतांना दिसून येत आहेत.

इतक्यातच ते थांबले नाही तर या समाजाचा राजकारणाकडे असणारा ओघ लक्षात घेऊन आंबेडकरी राजकारणाला तिलांजली देण्यासाठी १९७० ते १९८० च्या कालखंडात प्रात्यक्षिक करण्यात आले. रिपब्लिकन पक्ष, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल अश्या आंबेडकरी संघटनांना बदनाम करून नवीन संघटना उभ्या करण्यात आल्या. किंवा याच संघटनांमध्ये फाटाफूट घडवून आणण्यात आली. नवीन नेतृत्व म्हणून समाजावर दलित ब्राम्हणवादी नेतृत्व लादण्यात आले. जे १९८४ ला राजकीय पक्ष घेऊन समाजासमोर आले. सामाजिक आंदोलन करता करता ते आंदोलन राजकारणात कसे बदलले गेले कुणालाच कळले नाही. पण तेही शिस्तबद्ध होते. रिपब्लिकन पक्षाला तोडून आंबेडकरी, परिवर्तनवादी समूहाची राजकीय शक्ती क्षीण करून त्यांची राजकीय ताकद विभागण्यासाठी अनेक पुरजोर प्रयत्न करण्यात आले. त्यांना मोठे करण्यासाठी वेळोवेळी सर्वच स्तरावर मदतही केली गेली. महाराष्ट्रात पुरोगामी प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे. हा इतक्या लवकर याला बळी पडणार नाही. म्हणून त्याचा प्रयोग महाराष्ट्राबाहेर बुद्ध भूमीवर करण्यात आला. आपोआप त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरही झाला. आणि आज महाराष्ट्रातली पुरोगामी आंबेडकरी चळवळही राजकारणाच्या बहुपाश्यात सापडून क्षीण झाली. आज देशात प्रभावी अशी आंबेडकरी चळवळ नाही. परंतु ज्या महाराष्ट्रात ती प्रभावशाली राहायला पाहिजे होती. त्याच महाराष्ट्रात या चळवळीचा प्रभाव कमी होऊ लागला आहे

धम्मक्रांती राजकारण-समाजकारण संपवूनच हे दलित ब्राम्हणवादी थांबले नाहीत. तर सामाजिक क्रांतीलाही थोपवून धरायचे होते. कारण सामाजिक क्रांतीही या व्यवस्थेला वेळोवेळी हादरे देत होती. म्हणून मागील ३० वर्षांपासून काहींना हाताशी घेऊन जातीवाद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपल्या चेल्यांना या देशात हिंदू धर्म कसा टिकवून ठेवता येईल यासाठी मार्गदर्शन करतांना गोळवलकर गुरुजी म्हणतात, 'या देशातल्या प्रत्येक जातीतल्या एका माणसाला मोठे करा. त्याचे महापुरुषत्व मान्य करा. त्यांच्या संस्कृतीला मान्यता द्या.'  जेणेकरून बाबासाहेबांच्या जातीच्या विनाश्याच्या मोहिमेला शह देता येईल. आणि इथली जातीव्यवस्था जशीच्या तशी टिकवून ठेवता येईल. जातीव्यवस्था टिकून राहिली तर एकाच दगडात अनेक पक्षी मारता येतील. बुद्धाच्या धम्माकडे वळत चाललेला समाजाचा ओघ थांबविता येईल. समतावादी, मानवतावादी, परिवर्तनवादी चळवळीला हादरे बसतील. आंबेडकरी चळवळ क्षीण होईल. आणि भारत बुद्धमय होण्यापासून थांबविता येईल. कारण जातीव्यवस्था टिकून राहणे हेच हिंदू धर्माच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. ज्या दिवशी इथली जातीव्यवस्था मोडकळीस निघेल त्या वेळेस हा हिंदू धर्म आपले अस्तित्व टिकवून ठेऊ शकणार नाही. म्हणूनच बाबासाहेबांनीही या जातीव्यवस्थेला तोडण्यासाठी लढा दिला. हे इथली आर एस एस आणि व्ही एच पी वाली मंडळी जाणून आहेत. म्हणून जाती टिकवून ठेवण्यासाठी मूलनिवासी च्या रुपात यांनी आपले पिल्लू सोडले आहे. समता परिषद, समरसतावादी हि सर्व दलित ब्राम्हणवादाचीच पिलावळ आहेत. जी आंबेडकरी चळवळीला मार्गातून भटकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आज अस्तित्वात असलेले "मूलनिवासी संघटन, भारत मुक्ती मोर्चा आणि समरसतावादी" यांचे जातीव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी शिस्तबद्ध संचालन आर एस एस आणि व्ही एच पी च्या माध्यमातून केले जात आहे. वरकरणी तुम्ही आम्हाला ब्राम्हण म्हणून शिव्या द्या. आम्ही प्रतिक्रिया देणार नाही. पण काहीही करून इथल्या जाती टिकवून ठेवा. प्रत्येक जातीच्या महापुरुषाला मोठे करा. आणि त्यांचा बाबासाहेब बुद्धांकडे वळणारा ओघ थांबवून धरा. अश्याप्रकारचे षड्यंत्र आज स्वतःला दलित म्हणवून घेणा-यांच्या माध्यमातून चालविले जात आहे. संविधानाला धाब्यावर बसबून कुठल्या स्वातंत्र्याच्या गप्पा हे मूलनिवासीवाले आणि भारत मुक्ती मोर्चा वाले करीत आहेत. हे कोडे सुटता सुटत नाही. लोकांना संभ्रमित ठेवून दलित ब्राम्हणवाद या देशासाठी, समाजासाठी आणि संविधानासाठी नवा धोका निर्माण करू पाहत आहेत. आज कुणाला देश्यातून हाकलून लावणे शक्य आहे का ? दलितांचे वेगळे राज्य करणे शक्य आहे का ? ब्राम्हण विरुद्ध बहुजन समाज असा नवा संघर्षवाद निर्माण करणे शक्य आहे का ? संविधानाने धर्मनिरपेक्षता स्वीकारली आहे ती नाकारायची का ? प्रश्न आहे दलित आणि बहुजन (यांच्या म्हणण्यानुसारयाच्या हक्क आणि अधिकाराचा तर संविधानिक लढा का दिला जात नाही ? बंधुता आणि एकोपा टिकविण्याचा प्रयत्न का केला जात नाही ? सर्व अनुत्तरीत ठेऊन समाजाला भटकविण्याच्या आणि भडकविण्याचा विडा या दलित ब्राम्हणवादाने घेतला आहे. आंबेडकरी चळवळ यामुळे फलद्रूप होणार नाही.

दलित ब्राम्हणवादी  इथल्या आंबेडकरी समूहाचा बुद्धिभ्रंश करून आंबेडकरी चळवळ संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कधी राजकीय सत्ता तर कधी सामाजिक आंदोलनाच्या नावावर समाज विखुरला जात आहे. त्याला विखुरण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न थोड्याफार प्रमाणात स्वाभिमान टिकवून ठेवणा-या समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून केला जात आहे. त्याला समाजाने सहकार्य करण्याची गरज आहे. अन्यथा हिंदू धर्माला, इथल्या जातीव्यवस्थेला पायदळी तुडवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समानतावादी लढा आणि आजची आंबेडकरी चळवळ आपले अस्तित्व गमावल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा हा समाज जातीवाद्यांच्या शोषणाचा आणि गुलामीचा बळी पडल्याशिवाय राहणार नाही. आणि हे शक्य नसले तरी व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहातून तुम्ही बाहेर फेकले जाण्याचा धोका संभवतो आहे. या समाजाचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक  असे कुठलेही आंदोलन यानंतर यशस्वी होतील याची शक्यता दिसत नाहीया समूहाला आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर दलित ब्राम्हणवादाने पसरलेली आपली विषारी बहुपाशे आणि वलये तुम्हाला छाटून काढावी लागणार आहेत. दलित ब्राम्हणवादाच्या पुढ्यात जाऊन बसलेल्यांना धडा शिकवावा लागणार आहे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या हक्कांच्या संघटनांमध्ये समाविष्ठ होऊन तुम्हाला या व्यवस्थेविरुद्ध पुन्हा लढा द्यावा लागणार आहे. जो संविधानाने तुम्हाला बहाल केलेल्या हक्क अधिकारावर  अधिष्ठित असेल. येणारा भविष्यकाळ सुरक्षित करायचा असेल तर दलित ब्राम्हणवाद मोडीत काढा.
---प्रा.संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५


2 comments:

  1. तुमचं म्हणणं खरं आहे. साहित्यसभेतील किंवा बुद्धीस्ट फ्रेन्डसमधील काही पोस्टींग वाचताना ह्या लोकांची भाषा आणि संभाजी ब्रिगेडमधल्या लोकांची भाषा इतकी सारखी वाटते की ह्या दोघांत काही फरक करावा वा लाही अशी शंका येते. दोघेही वर्तमानकाळाबद्दल बोलतच नाहीत. तिकडे शिवाजी तर इकडे महात्मा फुले, सतत इतिहासाचे दाखले मला तर वाटतं, आपल्या समाजात मध्यमवर्गाकडे वाटचाल सुरू झाली की ब्राह्यण्यत्वाकडे पावलं पडायला लागतात. जातीच्या उच्चनिचत्वाची उतरंड मानणं ही ब्राह्मण्याची एक खूण असेल तर दुर्दैवाने अनेक जातीनी ब्राह्मण्याचा स्विकार केलेला दिसतो.

    ReplyDelete
  2. दीनानाथ मनोहर सरांचा संभाव्य धोका रास्त असला तरी संपूर्णता: वास्तव नाही. सर्वांनाच एकाच मोजमाप लागू होत नाही. संदीप नंदेश्वारांनी मांडलेले मुद्दे वर्तमानकालीन दृक-श्राव्याने आपण सर्वांनाच अनुभूतीस येत आहे. ओशो, गोयंका सारख्यांच्या नादी आज अनेक उच्च शिक्षित व तथाकथित स्वतःला सुसंस्कृत समजणारे लागल्याचे दिसते. त्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन पुढची पावले उचलली पाहिजे-. नंदेश्वरांच्या "दलित ब्राम्हणवाद : एक धोका " या लेखात निशितच दिशा दर्शकता जाणवते.

    ReplyDelete