Friday, 20 May 2011

शेंडीवाल्या बुढ्याले

शेंडीवाल्या बुढ्याले 
 
शेंडीवाल्या बुढ्याले लईच माज चढला 
खालीवर आपटून आपटून तोंडघशी पडला 
आपटून आपटून दमला, आता पार चढला
चक्रम बाबा अजूनही राहिला तसाच हेकना
खाली डोके  वरती पाय, लंगोटीचे  हायच हाय !
योगी बाबा बोंबलून थकला, उपोषणाला जाऊन बसला
कधी म्हणतो काळा पैसा, पतंजलीचा हिशोब कैसा
विज्ञानाच्या डॉक्टरावर शेंडीवाला करतो हल्ला
पैशेवाल्या गिधाडांवर शेंडीवाला मारतो डल्ला
योग म्हणून फसवतो मूर्खांना घेऊन हसवतो
विज्ञान याच्या मस्तकावर सत्यच बदडतो
समाजसेवक म्हणून राजकारण करतो काय रे !
शेंडीवाल्या बुवा तुझा ठाव ठिकाण काय रे !
लोकशाही आहे म्हणूनच भक्त मिळतात तुला
संविधान आहे म्हणूनच माया मिळते तुला
देशद्रोह करू नको भडव्या !
नाही तर  संविधान ठेचेल तुला
पंतप्रधान काय बदलतो स्वतःला बदल 
धमक असेल तर देशातील गरिबी बदल 
जमत नसेल तर शेंडी बांधून मिरव
पण जनतेला मानवतावाद शिकव
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५

No comments:

Post a Comment