Wednesday 25 May 2011

स्वाभिमानी आंबेडकरी राजकारण....

स्वाभिमानी आंबेडकरी राजकारण....

राजे हो काय जमाना आला 
बापाला बाप म्हणायला लाज वाटते म्हणून की काय
दुसराच बाप आम्ही पैदा केला 
करोडो झोपडयांची चुलही पेटत नाही
पोटाची तर सोडाच अब्रुचिही लाज वाटत नाही
तरीही सत्ता आमची म्हणून की काय
आम्हाला वाटते ते जेवले की आमचेही भरले
रस्त्यात मात्र आमच्याच आया बहिनी
होतात त्यांच्या अय्याशिच्या शिकार
तरीही शरम वाटत नाही आम्हाला
मात्र उथल माथ्याने  मारतो सत्तेच्या डिंगा

राजे हो सत्तेनीच होत नसतो दलितांचा उद्धार
पोटात भाकर आणि पाठीत लाथ
कधी तरी जगु द्या ! त्यांना  मानुसकीच्या जगात
सत्ता नाही,  नियंत्रण मिळवा !
पैसा नाही, इज्जत मिळवा !
बुद्धाचा मार्ग दिला बाबाने,
राजकारणातही वापरा सम्यक मार्ग

राजे हो नैतिकतेचे राजकारण तुम्हीच करू शकता.
बाबा च्या ‘राज्य समाजवादाला’ तुम्हीच आणू शकता.

फ़क्त एक कर मित्रा,
होऊ नको बेईमान बाबाच्या विचाराला,
होउन जाऊदे आता तरी
स्वाभिमानी आंबेडकरी राजकारणाची सुरवात.  
---कवी प्रा. संदीप नंदेश्वर ----

No comments:

Post a Comment