Wednesday, 18 May 2011

बघ ! तुला माझा आभास होतो का ?…

बघ !  तुला  माझा  आभास  होतो  का ?…
भाग -१ 

सखे,
तुला  माझी  आठवण  येत  असेल…
माझ्या  भेटीला  तू  आतुर  झाली  असशील…
तुला  माझा  विरह  सहन  होत  नसेल…
तू  आकंठ  झाली  असशील…
तुला  राहवले  जात  नसेल…
पण  थांब !
डोळे  मिटून  घे…
हातावर  हात  घे…
हाताच्या  आलिंगनाला  हृदयाशी  भिडव…
श्वास थांबून  स्तब्ध  उभी  राहा…
हळूच  तुझ्या  श्वासाला  मोकळे  कर…
हृदयाच्या  स्पंदनावर  नियंत्रण  ठेव…
तुझ्या  बाजूला  निर्माण  झालेल्या  वलयाचा  स्पर्श  होतो  का ? ते  बघ…
बघ !  तुला  माझा  आभास  होतो  का ?…

आता… उठ ! कामाला  लाग !…
घरातील  सर्व  सामान  अस्ताव्यस्त  असेल  ना…
मी  सोडून  गेलेल्या  आठवणी... 
आता  तुला  गोळा  करायच्या  आहेत…
माझ्या  सहवासातील  अस्ताव्यस्त  कणांना...
तुला  जपून  ठेवायचे  आहे…
हळुवार  उचल  त्या  क्षणांना…
कुठेही  रस्त्यावर  सोडून  देऊ  नकोस…
हात  लावशील  तिथे  तुला  माझा  स्पर्श  जाणवत  असेल…
बघ ! तुला माझा आभास होतो का ?...

आता... एक  कर…
उसंत  घे…
सोपा  तुला  बाजूलाच  दिसेल…
पड  त्यावर…
थोडी  शांत  हो…
कमी  जाणवते  ना  माझी…
त्या  सोप्यावर  माझ्यासोबत  घालविलेले  क्षण... 
तुला  बेचैन  करीत  असतील  बघ…
ते  क्षण  तू  आठवून  बघ…
काळीज  हेलावून  सोडेल  तुझे…
तुला  छळतील  त्यातील  प्रेत्येक  कण  आणि  कण...
छताकडे डोळे लावून बघत रहा...
बघ ! तुला  माझा  आभास  होतो  का ?...

आता...  जागी  हो...
तू  थकली  असशील... 
मला  माहित  आहे…
तुला  आता  नव्या  तेजाची  गरज  असेल…
कंटाळली  असशील  कामातून…
सोप्याला  तुझ्यापासून  दूर  कर…
हळूच  तुझी  पावले चालायला लागतील…
तुला  न्हाणी  घराकडे  ओढून  नेत  असतील…
तू  चालायला  लाग…
दाराच्या  कडीला  हळूच  स्पर्श  कर…
दार स्वतःच उघडेल...
आतील  गारवा  तुझ्या  अंगावर  धाऊन  येईल…
बघ !  तुला माझा आभास होतो का ?...

पाय  उचल…
प्रवेश  कर…
बाहेरची उब  तुला  सोडून  जाईल…
आतील  ओलावा  तुला स्वतःकडे ओढेल...
तुलाही त्याचीच गरज असल्याने तो तुला हवाहवासा  वाटेल…
दार  बंद  कर…
तू  बेचैन  होशील…
मला  कल्पना  आहे…
पण... अधीर  होऊ  नकोस…
तुझे  प्रावरण  अंगावरून  गळून  पडतील…
दचकून  जाऊ  नकोस…
बघ !  तुझा  हात  शॉवर  च्या  नळावर  गेला  असेल…
हळूच  त्याला  तुझ्या  हातात  बंद  कर…
तुझ्या  हाताची  मुठ  घट्ट झाली  असेल  ना…
घट्ट  मुठीने  नळ  सुरु  कर…
शॉवर  मधून निघणारा  फवारा…
अंगावर  घेण्यास  तू  आतुर  असशील…
पाण्याचा  गारवा  तुझ्या  केसांवर  पडेल…
तुझे डोळे बंद होतील...
थंडगार  पाण्याच्या  आच्छादनाने   तू  प्रफुल्लीत  होशील…
थेंबांचा  स्पर्श  तुला  हवाहवासा  वाटेल…
तुझ्या  नसानसांमधून   प्रवाह  गतिशील  होईल…
डोळे  बंद  ठेव…
आस्वाद  घे ! 
त्या  मधुर  क्षणाचा…
तुला  हायसे  वाटेल…
शरीर  सुगंधित  होईल…
मन  प्रफुल्लीत  होईल…
शरीरावरील  तरंगणा-या   थेंबांनी…
कुणाच्यातरी  स्पर्शाचा  आभास  होईल…
पाठीवरील  ओल्या  केसांना…
तू बाजूला करू नकोस...
कुणाच्यातरी  इशा-याने  ते स्वतःच बाजूला  होतील…
डोळे  उघडू  नकोस…
अचानक अंगाला हुरहुरी सुटेल...
घाबरून न जाता...
सामना कर...
ओळख तो स्पर्श...
बघ !… तुला माझा  आभास  होतो  का ?...

-----प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५

बघ !  तुला  माझा  आभास  होतो  का ?…
भाग -

आता पुन्हा तुझ्या कायेत
नवी उर्जा संचारली असेल.
ओल्याचिंब प्रदेश्यात तू भिजली आहेस.
बाजूला बघ !
टौवेल हातात घे !
पडद्याआड झालेले तुझे शरीर उबदार वाटत असेल.
मधून मधून त्यातून माझ्या डीओ चा गंध तुला गदगदीत करीत असेल...
लाघवी, मोहक, टवटवीत चेहरा घेऊन बाहेर ये
तुझ्या ओल्या केसांवर दवबिंदू साचले असेल
झटकू नकोस...
ते टिपण्यास मी चातकासमान आतुर आहे.
तू फक्त चालायला लाग...
चालतांना...
बघ ! तुला माझा आभास होतो का.....?

प्रसाधन गृहात तू उभी असशील.
आरसा तुला पाहून झुरला असेल...
तू मात्र हळूच त्यात स्वतःला न्याहाळून घे !
तुझे खरे प्रतिबिंब त्यातच दिसेल.
समजू नकोस  तो फ़क़्त आरसा आहे.
माझ्या नजरेतील तुझे सौंदर्य टिपणारा...
माझ्याशिवाय दुसरा कोण असू शकेल...
बिनधास्त हो !
त्यात तुला तुझी खरी ओळख दिसते का...?
बघ ! तुला माझा आभास होतो का...?
सोड आता त्याला...
शृंगाराकडे तुझा तोल जाऊ शकतो.
माझी आठवण येईल
नटू नकोस !
हे शब्द हळूच तुझ्या कानावर पडतील.
तू भानावर येशील.
प्रसाधने बाजूला होतील...
समोरून हळूच माझा चेहरा डोकावतांना दिसेल
तू लाजशील...थोडीशी लाडिक होशील...
लाजेचा सुस्कारा तुझ्या मुखातून बाहेर पडेल...
तुझे स्त्रीत्व तुला मिळेल.
तुझे नैसर्गिक सौंदर्य  फुलून येईल.
तू अधमाशी होशील...
बघ ! तुला माझा आभास होतो का.....?

वाट पहा !
आभास तुझा प्रत्यक्षात येईल...
इतक्यात तुझ्या कानावर एक आवाज ऐकू येईल.
"दारावरची बेल वाजेल...दरवाजा उघड...कोट तो स्वतःच काढेल...."
थांब !
घाई करू नकोस...
तो सौमित्र कदम आहे.
दिवाणखान्यातील आकाशवाणी केंद्रावरून...
तुला तो छळत आहे.
त्याच्या आवाजाने तुला माझेच भास होईल.
पळत जा...थांबव त्याला...
सांग ! मी तुझ्या सोबत आहे.
घरातील प्रत्येक वस्तू, कोपरा, माझ्या सहवासाने रुढला आहे.
माझी प्रसन्न मुद्रा…
तुला दिवाणखान्याच्या  भिंतीवरच दिसेल...
तुला न्याहाळतांना...
तू छान दिसत आहेस हे सांगतांना...
बाहेर जोराचा आवाज होईल...
वारा सुटेल...
बघ ! तुला माझा आभास होतो का....?

सखे,
खिडक्या दारे बंद कर !
वादळ उठले आहे.
घाबरू नकोस !
जसे ते तुझ्याकडे उठले आहे...
तसेच ते माझ्याकडेही उठले आहे...
धैर्याने त्याला सामोरे जा !
डोळे उघडून बघत रहा !
वादळासवे वाहणा-यांना तुझ्या नजरेत कैद कर  !
वादळालाही लाजवेल असा पराक्रम तुझ्या नजरेत उभा कर !
बघ ! तुला माझा आभास होतो का.....?

तू आलीस तेव्हाही वादळ होते.
तू गेलीस तेव्हाही वादळ होते.
इकडे-तिकडे सगळीकडेच वादळ होते.
बाबा गेले तेव्हाही वादळच उठले होते.
तुझ्याही मनात वादळ,
माझ्याही मनात वादळ,
वादळ हेच अस्तित्व आता तू स्वीकार !
दार उघड...!
बाल्कनीत ये !
वादळ अंगावर धावते का...? ते बघ !
उभी रहा !
वादळ तुझ्या बाजूलाच असेल.
हात पसर...
आमंत्रण दे...!
आश्चर्यचकित होऊ नकोस...
तुझ्या निडरतेला वादळाचा सलाम आहे.
तुझ्या बाजूलाही येण्याची हिम्मत होत नसेल.
उभी रहा काही काळ तशीच...
बघ ! तुला माझा आभास होतो का....?

तू विचार करत असशील.
मी होतो, तू होती तेव्हाही वादळच होते.
खोलीतल्या कोप-यातून वादळच घोंगावत होते.
आजही वादळच आहे...
घोंगावणा-या वादळाच्या आवाजाने
तू दचकून जात होतीस...
माझ्याच अंगावर धावून येत होतीस...
सुरक्षेचा कवच म्हणून...
माझे हातही नकळत तुलाच कवटाळीत होते.
तू लीन होत होतीस...
तू तल्लीन होत होतीस...
भान तेव्हा तुला कुण्या जगाचे नव्हते.
वादळ असेच सुरु असावे.
तू माझ्या बाहूत असावी.
वादळ सोडून जाऊ नये...
माझी मिठी सैल होऊ नये...म्हणून...
मनोमन तू झुरत होतीस...
येणा-या विरहाच्या वेदनेने तू तुटत होतीस....
पण...आज मी नाही.
तू तिथे, मी इथे
तू एकटी, मी एकटा
वादळ मात्र आलेच…
तुला भूतकाळात घेऊन जाण्यासाठी...
वादळाकडे पाहून.....
बघ ! तुला माझा आभास होतो का.....?
वाट पहा...
वादळ शांत होण्याच्या मार्गावर असेल.
रस्त्यावरच्या हालचालीला वेग आला असेल.
वादळापूर्वीची शांतता आता भंग झाली असेल.
आतुर होशील बाहेर पडण्यासाठी...
मागे वळून पहा...
घड्याळाचे काटे तुला खुणावत आहेत.
कुणाच्या तरी प्रतिक्षेची आठवण करून देत आहेत..
वाट बघत असेल
आतुर झाला असेल
डोळे गरुडा सारखे भिरभिरत असतील
तुला धडकी बसेल.
कासावीस होशील मिलनासाठी..
केसांवर नकळत हात तुझा
तुला घेऊन जाईल
बेभान होशील..
तुझ्या केसांमधून फिरणारा हात माझा असेल
तू शांत डोळे मिटून पडली होतीस तेव्हाचा...
बघ !  तुला माझा आभास होतो का ...?

तू सोडून गेलीस तिथेच तू पुन्हा आलीस.
कपाट उघड !
प्रश्नांकित होऊ नकोस !
डोळे बंद करून मुक्त श्वास घे !
तुला त्या दिवसाची आठवण होईल.
बागेतल्या फुलातून येणारा फुलपाखरू
तुला पाहून कासावीस झाला होता.
इकडे हि फुल, तुकडे हि फुल
मध्ये मात्र गुलाबाला लाजविणारा तुझा देह फुल...
फुलानेही लाजेने मन खाली घातली होती.
तुझ्या सौंदर्याने तोही भरवला होता.
फुल हि भारावतो, फुलपाखारुही भारावतो.
मी मात्र त्या बागेतल्या बाकावर बसून
सर्व लाडिकपणाने शहारून उठतो.
डोळ्याची पापणीही हलत नव्हती.
ते सर्व डोळ्यात कायमचे साठवून ठेवावेसे वाटत होते.
सर्व आठवेल तुला...
वेळ घालवू नकोस !
तुझ्या हातातही तोच ड्रेस आला असेल बघ !
आजही तू तेच परिधान कर !
शेला तू तसाच सोडून दे !
बांधण्यासाठी माझे हात सरसावतांना...
बघ ! तुला माझा आभास होतो का...?

निघ आता !
बाहेर पड...दारावरच्या कळीला मात्र लावायला विसरू नकोस.
पिंजा-यातील पोपटाला निघतो म्हणायला विसरू नकोस.
तोही तुला बघून गोंधळून गेला असेल.
आकाशातल्या परीने भेट दिली
साहेबांच्या महालाने चमकून उठावे
असेच काहीसे वाटले असेल त्याला...
भेटीला आतुर...सांग त्याला...
निघतांना तो तुला काळजी घे म्हणेल.
तुझी सोनियाची चाल पाहून...
पोपटही माझीच आठवण करीत असेल.
चालतांना तुझा हात मोकळा पाहून...
बघ ! तुला माझा आभास होतो का...?
 -----प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५

No comments:

Post a Comment