Wednesday 25 May 2011

जय भीम बोल…


जय भीम बोल

जय भीम बोल माझ्या मित्रा 
आता जय भीम च्या नावाखाली भरणार आहे जत्रा
जातीवाद्यांनी पालला आहे पाळीव् कुत्रा
भुन्कू देऊ नकोस त्याला, नाहीतर आहे खतरा.........
आता तरी एकदा... जय भीम बोल माझ्या मित्रा.........................

खाऊजा आले, खाजगीत बोलू लागले... घ्या यांना स्पर्धेत
देऊन टाका मागतील ते, तोंड मात्र बंद ठेवा
कारण...
काही केल्या तोंडात यांच्या जय भीम मात्र आहे
म्हणून नोकरी आणि  छोकरित करा यांना व्यस्त
देऊ नकोस मित्रा त्यांच्या अश्या हाती गोत्र
म्हणून म्हणतो आता तरी... जय भीम बोल माझ्या मित्रा......

आरक्षण खाजगीतही देऊ म्हणून संपवतिल तुझे सरकारी आरक्षण
सेझ च्या नावाखाली घेतील तुझे काढून शस्त्र
म्हणतील हा घे पैसा आणि दे फेकून वस्त्र
मित्रा धम्म देऊन बाबा ने तुला दिले शस्त्र आणि वस्त्र
भिकमांग्या वृत्तिसाठी सोडू नको धम्म
म्हणून म्हणतो एकदा तरी... जय भीम बोल माझ्या मित्रा....

स्पर्धा, पैसा, नोकरी, छोकरी काही लागत नाही धम्मात
बाबांच्या विचारांचा फ़क्त वारस होउन दाखव
तुझ्या जीवनाचा आहे तूच शिल्पकार... सांगुन गेले माझे भीमराव
वावटळीच्या जगात घे मर्दानी बाणा माझ्या भीमाचा
लाव डरकाळी एकदा... जय भीम... जय भीम... बोल माझ्या मित्रा.........
---कवी प्रा. संदीप नंदेश्वर....

No comments:

Post a Comment