Saturday 24 September 2011

सांभाळून वागा !

  
सांभाळून वागा !
दलालांच्या राज्यात विचारांचा व्यापार होत नसतो
माणुसकीच्या नावाखाली व्यवसाय करायचा नसतो 
इथे विचारांच्या पाठीवर मेंढरांचा कळप पोसला जातो
सुशिक्षित मुर्खांचा काळाबाजार सदैव केला जातो

अख्खे वाचनालय जणू काही याच्याच मस्तकात आहे
तत्वज्ञानाचा पाया जणू यांच्याच पायावर उभा आहे
कुठून कुठून शोधतात यांच्या मयतीवरचे सामान
डोके कधी फिरले तर दाखवून देईन कायमचे आसमान

माझ्या बापाच्या डोक्यात तत्वज्ञानाचे महासागर होते
छटाकभ-याच्या भून्ग्यांनो तुमच्या बापांनाही ते जमणार नव्हते
अबे ! किती बदनामी कराल ! तुमची अख्खी पिढी संपून जाईल
जरा सांभाळून वागा ! नाहीतर कायमचे अस्तित्व मिटून जाईल
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५

No comments:

Post a Comment