दीक्षाभूमीच्या वाटेने
आयुष्याच्या वळणवाटेवर
माझेही एक महाल असावे
सर्वांग सुशोभित असे
पाखरांचे घरटे असावे
चीलापिलांना हक्काचे
डोक्यावरील छप्पर असावे
दिक्षाभूमीच्या शिखरावर
निळ्या पाखरांचे निळे वादळ असावे
त्या बोधीवृक्ष्याच्या खाली
संपूर्ण मानवी जीवनाचे सार असावे
जगण्याच्या भटकंतीमध्ये
कधीतरी दीक्षाभूमीच्या वाटेने असावे.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५
No comments:
Post a Comment