Sunday 11 September 2011

आम्ही लढतो आहोत


आम्ही लढतो आहोत

भविष्याला काहीतरी देण्यासाठी म्हणून आम्ही लढतो आहोत
जे आम्ही सोसले ते इतरांनी सोसू नये म्हणून आम्ही लढतो आहोत
आमच्या मार्गातील काटेरी वाळवंट साफ व्हावे म्हणून आम्ही लढतो आहोत
उद्याच्या शिखरावर यशाचा मुकुट घालण्यासाठी म्हणून आम्ही लढतो आहोत

भविष्याच्या सूर्योदयाला नमन करण्यासाठी आम्ही जगतो आहोत
स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न उराशी बाळगून आम्ही जगतो आहोत
अर्धपोटी उपाशी, कांदा भाकर खाऊन आनंदाने आम्ही जगतो आहोत
पण येणा-या पिढीच्या भविष्यनिर्मितीसाठी म्हणून आम्ही जगतो आहोत

इतिहासातील पानापानात स्वातंत्र्यासाठी आम्ही झटलो आहोत
आजही हक्क आणि अधिकारासाठी सतत आम्ही झटतो आहोत
गुलामगिरीचे साखळदंड तोडण्यासाठी आम्ही झटतो आहोत
समतेच्या निर्मितीचे पाईक म्हणून सदैव आम्ही झटतो आहोत

लोकशाहीवर व्यक्तिवादी हुकुमशाहीचा निषेध आम्ही करीत आहोत
देशभक्तीचे कायद्याच्या चौकटीत पालन आम्ही करीत आहोत
सामाजिक स्वातंत्र्याचा जयघोष आज आम्ही करीत आहोत
गुलामगिरीच्या वारस पुत्रांना सावधान आम्ही करीत आहोत
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५



No comments:

Post a Comment