भूक
भुकेने माणसे इथे जगतात कसे
उद्ध्वस्त आयुष्य घडवितात कसे
उपाशी पोटी जगणे त्यांना जमले कसे
आयुष्याचे पोटाशी हे नाते कसे
गरिबांच्या टाळूवर शिजलेल्या भाकरी
पोटात रीचवतांना देवाची चाकरी
बिमारीचे होता जेव्हा तुम्ही शिकारी
नजरेने लचके तोडतो माझा भिकारी
अरे आमची भूक जगण्याची आस आहे
उपाशी पोटी राहूनच या देशाची शान आहे
कांदा भाकरीचा तुकडा इथे देश घडवितो
तूप रोटीचा लालची तडफडत मरतो
करोडो उपाशी जीवांचा आकांत सांगतो
उपाशी पोटी बाप माझा संविधान लिहितो
सांग आता ! तुझ्या तिजोरीचा ताबा मी घेतो
भडव्या ! भुकेल्या पोटानेच तुझा जीवही घेतो
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५
No comments:
Post a Comment