दुःख
रोजच उजाडतो सूर्य जरी का
क्षितीजापलीकडे जाऊन लपते
ऋतुचक्राचा हा अद्भुत फेरा
कधी न चुकता अलगद छळते
रोजच होती शत्रूंचे हमले
जीवनयुद्ध अघोषित असते
अति सुखाचा वावर जेथे
जगण्याचा आनंद विसरते
दुःखाचा हा पर्वत जेथे
नकळत जेव्हा मनी बहरते
सूर्यास्ताच्या क्षितिजावरही
काळोखाची भीती उमलते
रोजच असते दुःख जगावर
क्षणामागाच्या विश्वाभोवती सुखच दडले असते
भाकरीच्या तुकड्यावर जगणाराही
क्षणिक सुखाचा बळीच ठरते
दुःखाच्या या काळोखावर
सुख जगाचे शोधत असते
आनंदाची उंच भरारी
दुःखावरही मातच करते
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५
रोजच उजाडतो सूर्य जरी का
क्षितीजापलीकडे जाऊन लपते
ऋतुचक्राचा हा अद्भुत फेरा
कधी न चुकता अलगद छळते
रोजच होती शत्रूंचे हमले
जीवनयुद्ध अघोषित असते
अति सुखाचा वावर जेथे
जगण्याचा आनंद विसरते
दुःखाचा हा पर्वत जेथे
नकळत जेव्हा मनी बहरते
सूर्यास्ताच्या क्षितिजावरही
काळोखाची भीती उमलते
रोजच असते दुःख जगावर
क्षणामागाच्या विश्वाभोवती सुखच दडले असते
भाकरीच्या तुकड्यावर जगणाराही
क्षणिक सुखाचा बळीच ठरते
दुःखाच्या या काळोखावर
सुख जगाचे शोधत असते
आनंदाची उंच भरारी
दुःखावरही मातच करते
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५
No comments:
Post a Comment