आंबेडकरी चळवळीत नव्याने काम करणा-यांनी आता एक नवीनच शक्कल काढली आहे.
म्हणे "बुद्धिझम आतापर्यंत का भारतात पसरू शकला नाही तर याचे कारण आहे कि,
आम्ही फक्त घटना चालवीत आलो. बुद्धिझम पसरविला नाही." आता या विद्वानांना
कौन सांगेल कि भारतीय संविधान म्हणजेच यांची घटना आणि बुद्धिझम वेगळा आहे
का ? अजून काय म्हणतात कि "घटना आणि धर्म जर लोकांसमोर ठेवला तर लोक
धर्माची मागणी करतील. घटनेची नाही." वाचून आणि असे ऐकूनही संताप येतो.
एकीकडे बाबासाहेब भारतीय संविधान आणि बुद्धिझम यात तफावत करीत नाही. आणि हे
बघा विद्वान ! ज्या बुद्धिझमवर आधारित देशाचे संविधान बाबासाहेबांनी
बनविले त्यालाच आता हे लोक असे बोलायला लागले आहेत. आणि म्हणतात काय तर
आम्ही पुण्यात पाली आणि बुद्धिझम साठी एक इंस्टीट्युट काढले आहे. आणि आता
आम्ही या देशात बुद्धिझम पुन्हा रुजविणार आहोत. संविधानाला सोडून.
पुण्यातील बौद्ध संघर्ष समिती नावाचे हे पीलांटू आहे. आणि यांचे कार्यकर्ते
आता असे बोलू लागले आहेत. आम्ही संविधानासोबतच बुद्धिझम ला पसरविण्याचे
काम केले आहे. परंतु काही मनुवादी लोकांनी (रजनीश/ओशो/गोयंका/टीबीएमएस)
बुद्धिझम ला दुषित केले आहे. त्यामुळे भारत बुद्धमय करण्याच्या
बाबासाहेबांच्या स्वप्नाला तडा गेला आहे. हे यांना कुणी तरी सांगावे.
एकीकडे घटना सोडून बुद्धिझम पसरविला पाहिजे म्हणणारे आणि दुसरीकडे भारत
मुक्ती म्हणणारे यांच्यात मला कुठेही तफावत दिसत नाही. दोन्ही कडे भारतीय
संविधानाला नाकारण्याची प्रक्रिया सुरु आहे. जे अण्णा/केजरीवाल/आरएसएस/भाजप
करीत आहेत तेच यांना पण पाहिजे आहे असे दिसते. सांगा यांच्यात काही भेद
करता येईल का ?
टीप :- यावर कुणाला काही तक्रार असल्यास ९२२६७३४०९१ या नंबर वर संपर्क करावा. किंवा ३०१, सत्यम हाईट, गणेश धाम, हुडकेश्वर रोड, नागपूर-३४ या पत्त्यावर प्रत्यक्ष संपर्क करावा...
"सम्यक जय भीम"
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
टीप :- यावर कुणाला काही तक्रार असल्यास ९२२६७३४०९१ या नंबर वर संपर्क करावा. किंवा ३०१, सत्यम हाईट, गणेश धाम, हुडकेश्वर रोड, नागपूर-३४ या पत्त्यावर प्रत्यक्ष संपर्क करावा...
"सम्यक जय भीम"
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
No comments:
Post a Comment