धम्माला सत्तेची गरज काय ?
१९४५ द्वितीय जागतिक महायुद्धानंतर जगातील बहुतांश देशांनी लोकशाही, संसदीय व्यवस्था आणि कायद्याचे राज्य स्वीकारले. वसाहतवादी, धार्मिक आणि राजेशाही जवळपास संपुष्टात आली. भारताने तर संसदीय व्यवस्था, लोकशाही आणि कायद्याचे राज्य संविधानाच्या माध्यमातून स्वीकारून जगासमोर एक आदर्श निर्माण केला. यासोबतच धर्माला मिळणारा राजाश्रय संपुष्टात येऊन धार्मिक स्वतंत्राचा व्यक्तीशः अधिकार प्राप्त झाला. जगात आता कुठेही कुठल्याही धर्माला राजाश्रय प्राप्त नाही. (काही इस्लामिक राज्य वगळता) बहुसंख्य आणि अल्पसंख्य अशी धार्मिक लोकसंख्येच्या आधारावर विभागणी करण्यात आली. परंतु राज्याचा कुठलाही एक धर्म म्हणून स्वीकारला गेला नाही. खुद्द पाकिस्थानातही हिंदू आणि इतरही धर्माचे लोक राहत असल्याने त्यांना निव्वळ इस्लाम धर्माचा जागतिक पुरस्कार करता येत नाही. आधुनिक काळात राजसत्ता आणि धर्म या भिन्न आहेत. परंतु भारतात आजही हिंदू धर्माचा पुरस्कार केला जातो. संविधानातून नव्हे तर हिंदू कट्टरपंथीयांच्या माध्यमातून. मग पाकिस्तानात जर इस्लाम चा पुरस्कार केला गेला तर इथल्या हिंदूंच्या पोटात आगडोंब का उठते हे कळायला मार्ग नाही. याचाच अर्थ इथले कट्टरपंथीय लोकशाही आणि संविधान मान्य करीत नाही. कायद्याचे राज्य मान्य करीत नाही. हेच सिद्ध होत आहे. आणि तसा उल्लेख हिंदू कट्टरपंथीयांकडून वारंवार जाहीररित्या केला गेला आहे.

हे सर्व कट्टरपंथीय धार्मिक संप्रदायाकडून होते हे मान्य करता येईल. परंतु भारतात बौद्ध धम्माचे पुरस्कर्ते म्हणवून घेणारे काही बहुरूपी (मुळात ते बुद्धिस्ट नसल्यामुळे बहुरूपी) बामसेफ, बीएसपी आणि एम्बस चे विद्वान बौद्ध धम्माला इतिहासाचे दुषणे देत राजाश्रय मिळवून देण्याच्या वल्गना करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांची ही प्रताडणा आहे. सत्ता प्राप्त केल्याशिवाय बौद्ध धम्माला राजाश्रय मिळणार नाही आणि बौद्ध धम्म फलद्रूप होणार नाही अशी या विद्वानांची मांडणी किती हास्यास्पद वाटते ! सत्ता मिळाल्यावरच बौद्ध धम्माचा स्वीकार करणार असे म्हणणारे मादक विद्वान नेते आणि त्यांचे मेंढपाळ कार्यकर्ते नेमक्या कुठल्या धर्माकडे वाटचाल करीत आहेत ? हे तरी आता आधुनिक पिढीने समजून घ्यावे. सत्तेसाठी धम्माचा स्वीकार केला जात नाही ही बाब बौद्ध धम्मासाठी अतिशय लांच्छनास्पद आहे.
धम्म हा जीवनमार्ग आहे. तो जीवनमार्ग न स्वीकारता राजकारणासाठी धम्माला वेठीस धरणे म्हणजे देशद्रोहच नाही तर समाजद्रोह सुद्धा आहे. आम्ही धम्मानुसार वागतो. धम्म चालवितो. मात्र धम्माचा स्वीकार करीत नाही. हिंदू धर्माला शिव्या देतो. पण त्याच हिंदू धर्मात राहून. ही कुठली राजनीती आहे. हे आता तरुण पिढीने ओळखणे गरजेचे आहे. अश्या वल्गना जेव्हा या विचारवंतांकडून ऐकायला येतात. तेव्हा हा समाज आणखी किती काळ फसविला जाणार आहे. बौद्ध धम्माला आलेली ही या बहुरूपी सत्तावाद्यांकडून आलेली ग्लानी आम्ही केव्हा दूर करणार आहोत. किती दिवस ताटकळत राहायचे.? धम्माच्या नावाने यांचे राजकारण किती दिवस सहन करायचे ? धम्माच्या नावाने राजकारण करणा-या देशद्रोही समाजद्रोह्यांना आम्ही केव्हा उघडे पाडणार आहोत ? यांना केव्हा धडा शिकविणार आहोत ? बर्मा, मलेशिया, थायलंड, चीन, जपान इ. देशांमध्ये बौद्ध धम्माला राजाश्रय नाही तरी तिथे बौद्ध धम्म फलद्रूप होतो आहे. भारतातच या विद्वान नेत्यांना सत्तेची धम्मासाठी काय गरज आहे ?
सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हालाच द्यावी लागणार आहेत....
"सम्यक जय भीम"
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
agadi achuk muddyavar laksh dile tumhi.
ReplyDeletekharach dhamma pracharasathi sattechi garaj mahatvachi nahi.
First throw some light on Ashoka patronage to Buddhism and its effect on survival of Buddhism.
ReplyDeleteOtherwise ur blog and thoughts are useless.
As buddha said, ignorance, hatered and greed are man biggest enemy.