Saturday 14 July 2012

बघ ! तुला माझा आभास होतो का ? - 4


प्रस्तावित दीर्घकाव्य (बघ ! तुला माझा आभास होतो का ?) यातून...

आज तू अस्वस्थ असशील.
काम नसतांना कामाचा बहाणा करशील.
वेळ असतांना व्यस्ततेचे कारण सांगशील.
कारण तू व्यस्त आहेस माझ्या आठवणीत
उघडू पाहतेस माझ्या आठवणीतला एक एक पान
सखे माझी आठवणच तुला स्वस्थ बसू देत नाही.
काही केल्या तुझ्यापासून दूर होऊ देत नाही.
कुणाला सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही.
कळतेय मला तुझ्या मनातली घालमेल
अचानक जीवनात आलेली हीच ती कातरवेळ
अगदी आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलावेसे वाटते
तुझ्या शब्द लहरींना झेलावेसे वाटते.
आठवून तेच शब्द हसावेसे वाटते
म्हणूनच तू...
मी नसल्याचा बहाणा करू नकोस
अलगद कपाटाला हात लाव
कपाट उघड !
समोर दिसणारी माझी डायरी तुला पाहून हसत असेल ना !
त्याच डायरीला पाहून...
बघ ! तुला माझा आभास होतो का ?
---डॉ. संदीप नंदेश्वर,नागपूर.

No comments:

Post a Comment