सखे !
जरा सांभाळ स्वतःला
आठवणींना घेऊन समोरच्या प्रवासाला निघ !
प्रेमरूपी वादळापासून दूर होऊ नकोस.
भावनेच्या जहाजाचे होकायंत्र काढू नकोस.
आयुष्याच्या महासागरात दिशाहीन भटकू नकोस.
स्थिर हो, अधीर होऊ नकोस.
शांत हो, अस्थिर होऊ नकोस.
आता जरा विचार कर.
तुझ्या बंद डोळ्यांना उघड.
एक नजर...
दिवाणखान्याच्या भिंतीवर टांगलेल्या
हुसेनचीत्राकडे बघ !
आठवते का काही ?
तू, मी, पाणी, सागर, खळखळणा-या लाटा
आणि चौपाटीवर बसलेला हुसेन...?
तुझ्या माझ्या सागर मिलनाचे चित्र रेखटत होता.
तेच ते चित्र आज पडद्याआड होईल.
त्या चित्राकडे नजर वळतांना...
बघ ! तुला माझा आभास होतो का ?
No comments:
Post a Comment