Wednesday 18 July 2012

वैयक्तिक कर्तबगारी

"वैयक्तिक कर्तबगारी हि आदरणीय असते, पण पुष्कळ वेळा ती अनुकरणीय नसते ; व म्हणूनच वैयक्तिक कर्तबगारी व सामुदायिक कर्तबगारी यांच्यात तुलना करता सामुदायिक कर्तबगारी शेकडो पटींनी श्रेयस्कर ठरते. वैयक्तिक कर्तबगारी आकाशएवढी उंच असली तरी साधारण उंचीच्या सामुदायिक कर्तबगारीच्या पासंगालाही ती पुरणार नाही." (अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. १ फेब्रुवारी १९२९, खंड - २० - पान न. ३५) बाबासाहेबांवर होणा-या टीकेला उत्तर देण्यासाठी हा लेख तेव्हाच्या बहिष्कृत भारतात सामादाकांनी लिहिला होता. अतिशय बोध घ्यावी अशी काही वाक्य मी इथे दिलेली आहेत. कारण आज इथे मात्र वैयक्तिक कर्तबगारीने रान माजविले आहे. प्रत्येकाला मी किती श्रेष्ठ आणि समाजाचा उद्धारक हे सिद्ध करायचे आहे. ज्यांनी साधा दगडही कधी फोडला नाही त्यांनी समाजाचे आम्हीच उद्धारक म्हणून बुद्धिभेद केला आहे. आणि मेंढरांची जमत त्याला बळी पडून वैयक्तिक कर्तबगारीचा उदोउदो करीत सुटले आहे. १९७२ नंतर ज्यांनी समाजासाठी त्याग केला ते आज समाजापासून तुटले आहेत. आणि ज्यांनी समाजाला विकून (जाती जोडो आणि वैचारिक आंदोलनाच्या नावाखाली) स्वतःची पोळी भाजून घेतली. ते आता महापुरुषांच्या रांगेत बसू लागली आहेत. सायकल वरून फिरायची लायकी नसणारे, बुद्धीने दिवाळखोर असणारे मोर्चाचे, आणि काळ्या मण्याची गाटी घालायची लायकी नव्हती ते हि-याचे दागिने घालणारे आज कुठे आहेत. आणि जे समाजासाठी झटले, लढले, मेले, आणि आताही तडपत आहेत ते कुठे राहिले ? हे सर्व आम्ही मेंढरांची जमात बनल्यामुळे झाले आहे. जर आम्ही वैयक्तिक आणि सामुदायिक कर्तबगारी ओळखली असती तर आज हि परिस्थिती पाहायला मिळाली नसती. (राजकारण आणि सत्ता सोडून बोलावे एवढी विनंती)

टीप :- यावर कुणाला काही तक्रार असल्यास ९२२६७३४०९१ या नंबर वर संपर्क करावा. किंवा ३०१, सत्यम हाईट, गणेश धाम, हुडकेश्वर रोड, नागपूर-३४ या पत्त्यावर प्रत्यक्ष संपर्क करावा...
"सम्यक जय भीम"
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. 

No comments:

Post a Comment