Friday 13 July 2012

बघ ! तुला माझा आभास होतो का ?

 
माझ्या प्रस्तावित (बघ ! तुला माझा आभास होतो का ?) या महाकाव्यातील...अंश
 

आठवते का तुला तुझे ते शब्द
गाडीवरच्या लॉंग ड्राईव्ह ची गोष्ट
घट्ट मिठी मारून तू म्हणाली...
.....
"चल आता वा-याशी स्पर्धा खेडुया
किना-यावरील सर्वांना प्रवाहात बांधूया
गाडीवरच्या एक्सलेटरला घट्ट आवरूया
तुझ्या माझ्या मस्तीने चंद्र लाजवूया
थंड श्वासाने वातावरणाचे उन्ह तापवूया
समुद्राच्या किनारी आपण दोघे झिम्मा खेडुया"
.....
चालला होता असाच तुझा माझा
वेगाच्या बेभान गोंगाटात तो लांबचा प्रवास
चहुबाजूने उभी होती नजरांची लांबच लांब रांग
बिनधास्त, बेहोश, मदमस्त आकाश
कुश्ती खेळत होता जमलेल्या परावर्तीत ढगांशी
वाट बघत होता तुझ्या आणि माझ्यावर वर्षावाची
पण अचानक...
लाजेने शरमला होता तोही...
तुझ्या त्या बिनधास्त वागण्याने घाबरला होता तोही...
ढग आजही मस्तीत गुंगले आहेत.
आकाशाच्या कुस्तीत रंगले आहेत.
वाट बघतात तुझ्या बहरण्याची, फुलण्याची
तू मात्र निराश तशीच उभी आहेस.
वाटेकडे डोळे लावून वाट बघत आहेस.
थेंबांच्या वर्षावाने ओली होत आहेस.
ओल्याचिंब आकाशात...
मृगजळाच्या ओलाव्याचा सुगंध दरवळतांना...
सखे बघ ! तुला माझा आभास होतो का ?
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

No comments:

Post a Comment