Friday, 13 July 2012

बघ ! तुला माझा आभास होतो का ? - 1

 
माझ्या प्रस्तावित (बघ ! तुला माझा आभास होतो का ?) या महाकाव्यातील...अंश


तू ज्या रस्त्याने धावत आहेस

तो रस्ता तुला परिचयाचा असेल
रस्त्यावरच्या खाणा-खुणा अजूनही ताज्या असतील
सोबतीची वर्दड कायम असेल.
त्यामुळे ते क्षण पुन्हा जिवंत होतील.
तू चालशील, तू धावशील,
तू दमशील, तू थकशील
वाटेच्या बाजूला हात पकडशील
लगेच उत्साह अंगात भरेल
वा-याला मिठी मारण्यासाठी,
वेगळा कवेत घेण्यासाठी,
रस्त्याच्या कडेला विसावण्यासाठी...
नजर समोरच पडेल त्या हिरव्यागार गवतावर
बाजूच्या शिवारातील त्या हिरव्यागार गवतावर पडावेसे वाटेल.
बोलावेसे वाटेल, हसावेसे वाटेल,
खांद्यावर डोके ठेऊन जगावेसे वाटेल.
रस्त्यावरची गाडी बघून,
घट्ट मिठी मारून,
लॉंग ड्राईव्ह करावीशी वाटेल.
तू लगेच उठशील, पळत येशील त्या गाडीपाशी
त्या गाडीला बघून धावतांना...
सखे बघ ! तुला माझा आभास होतो का ?
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

No comments:

Post a Comment