Friday 13 July 2012

बघ ! तुला माझा आभास होतो का ? - 2

माझ्या प्रस्तावित (बघ ! तुला माझा आभास होतो का ?) या महाकाव्यातून...साभार प्रक्षेपित...

रात्री तू बिछान्यावर...

आठवणींचा अल्बम घेऊन पडली होतीस.
सहवासाचा एक एक पान पलटत होतीस.
प्रेमाच्या आक्रंदनाने क्षण भारावले होते.
तू मात्र निपचित पडून
उघड्या डोळ्यांनी...
जीवनातील सहवासाचे चांदणे मोजीत होतीस.
तुझी काया शेजारचा स्पर्श शोधीत होती.
तेव्हा...
तुझ्या वेणीतील गजरा मात्र...
खुल्या केसांना सोडू पाहत नव्हता.
बिछान्यावर प्रेमाचा वर्षाव करू पाहत होता.
वारंवार खुणावत होता.
वारंवार डोकावत होता.
प्रेमरूपी सुगंधाची उधळण करू पाहत होता.
मधेच कुणाच्यातरी स्पर्शाने गदगदीत होऊ पाहत होता.
कुणाच्यातरी आठवणींचा सहारा शोधू पाहत होता.
अशातच...
तुझा हात शेजारच्या उशीचा सहारा घेतांना...
बघ ! तुला माझा आभास होतो का ?
...डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

2 comments: