Tuesday 22 November 2011

सत्तेचा लाडू

 सत्तेचा लाडू
सत्तेची धार जेव्हा बोथट झाली
खुर्चीची  भूक अधिकच वाढली
व्याकूळतेच्या लाचार सत्ताधा-याने
सत्ता विभाजनाचे भोजन दिधले 

इथे नाही तर तिथे
पण कुठेतरी सत्तेचा लाडू पत्रावळीत पडेल
याच आशेत सत्तेच्या लाडूसाठी झुंबड उठली
यातच भिका-याचे गणित चुकले

एकसंघ देशाच्या फाटक्या सीमारेषेत
पूर्ण नाही तर तुकड्यासाठी
आवाजी मताने पंगत उठवली
इथूनच पुढे विधानसभा बरखास्त झाली.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.....

No comments:

Post a Comment